• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशीला क्लिन बोल्ड करताच काइल जेमीसनचा संयम सुटला, असं काही केलं Video

May 1, 2026 by admin Leave a Comment


Vaibhav Sooryavanshi vs Kyle Jamieson: आयपीएल 2026 स्पर्धेतील 43वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी निवडल्याने राजस्थानकडून आक्रमक जोडी असलेल्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल असं वाटलं होतं. सुरूवातही तशीच झाली होती. पहिल्या चेंडूवर यशस्वी जयस्वालने षटकार मारला होता. पण तिसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालची विकेट काढली. या षटकात काही वैभव सूर्यवंशीला स्ट्राईक मिळाली नाही. पण दुसऱ्या षटकात काइल जेमिसनच्या गोलंदाजीचा सामना करण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्याच चेंडू जोरदार प्रहार केला आणि चौकार मारला. त्यामुळे वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळणार असं वाटलं. पण दुसऱ्याच चेंडूवर काइल जेमिसनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

जेमिसनने वैभव सूर्यवंशीला बुलेट यॉर्कर टाकला. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघाला आणि स्टंप घेऊन गेला. वैभव सूर्यवंशीला काही कळायच्या आधीच क्लिन बोल्ड झाला. त्याला काइल जेमिसनकडे पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. वैभवची विकेट काढल्यानंतर काइल जेमिसन मात्र आक्रमक झाला आणि त्याने तसंच सेलीब्रेशन केलं. त्याने वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात डोळे घालून टाळ्या वाजवल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या सर्वच खेळाडूंनी आक्रमक सेलीब्रेशन केलं. सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे त्याची बॅट चालली तर काय होऊ शकतं याची कल्पना दिल्ली कॅपिटल्स संघाला होती. जर टिकला असता तर चित्र काही वेगळं असतं.

An in-swinging yorker 😲🔥

🎥 Kyle Jamieson gets Vaibhav Sooryavanshi early 👊

Wait for the celebration 👀

Updates ▶ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/6vxJ5ahlb3

— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार रियान परागने मोर्चा सांभाळला. रियान परागने ध्रुव जुरेलसोबत तिसऱ्याविकेटसाठी 59 चेंडूत 102 धावांची भागीदारी केली. यात रियान परागने 35 चेंडूत 61 धावांची खेळी केली. ध्रुव जुरेल 24 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्यानंतरही रियान परागने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्या व्यंगचित्रावरून सुषमा अंधारेंचा प्रचंड संताप; राणे ते खोत, पडळकर ते भुजबळ एकलाही सोडलं नाही, सगळंच काढलं
  • Mumbai | कलिंगडानंतर मृत्यू प्रकरणाला नवे वळण: डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
  • भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…
  • Multibagger stock: गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा; 370 टक्क्यांची तुफान तेजी, हा शेअर कोणता?
  • शेजारील राज्यात 44 मोरांच्या मृत्यूने खळबळ, H5N1 ला दुजोरा,10 किमी क्षेत्रात कंटेनमेंट झोन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in