• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभवची बॅट स्विंग पाहून सचिन तेंडुलकरने केलं असं ट्वीट, सूर्यवंशी सरळ म्हणाला की..

May 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी चर्चेत आहे. इतक्या लहान वयात त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे. आयपीएल एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली. यात त्याने 12 षटकार आणि 5 चौकार मारले. त्याने पावरप्लेमध्येच सनरायझर्स हैदराबादच्या विजयाच्या आशांवर पाणी टाकलं होतं. झालंही तसंच.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 243 धावा केल्या. या धावा काही सनरायझर्स हैदराबादला गाठता आल्या नाहीत. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचं कौतुक केलं. सचिन तेंडुलकरने कौतुकाची थाप पाठीवर दिल्यानंतर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीचं कौतुक करत ट्वीट केलं की, ‘त्याची बॅट स्विंग करण्याची आणि लेग स्टंपवर येणाऱ्या चेंडूंसाठी जागा करण्यासाठी पुढचा पाय बाजूला करण्याची पद्धत विलक्षण आहे. यामुळेच वैभवला त्याचा नैसर्गिक आक्रमक खेळ खेळण्यास मदत होते. ती खेळी खरोखरच नेत्रदीपक होती!’ सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासून आक्रमक होता. त्याने 16 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचं विक्रमी शतक फक्त 3 धावांनी हुकलं आणि 29 चेंडूत 97 धावा करून बाद झाला.

Vaibhav Sooryavanshi’s bat swing has been outstanding. What’s even more remarkable is how beautifully he clears his front foot to create room for balls aimed at his legs. This freedom allows him to play the way he does.

That innings was nothing short of spectacular!

— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 27, 2026

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केल्यानंतर वैभव सूर्यवंशीनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ध्रुव जुरेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा करत सांगितलं की, त्याला सचिन तेंडुलकरने ट्वीट केल्याचं माहिती नव्हतं. पण जेव्हा कळालं तेव्हा आनंद झाला. वैभव सूर्यवंशी म्हणाला की,, “खूप छान वाटतंय, सर… यामुळे मला प्रेरणा मिळते. तुम्ही आत्ताच मला सांगितलं, मला तर हे माहीतच नव्हतं. आणि सगळ्यांनाच माहीत आहे की ते क्रिकेटचे देव आहेत. जर त्यांनी आमच्यासाठी काही ट्वीट केलं, तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एका महान व्यक्तीने आमच्यासाठी ट्वीट करणं हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

One brought the fireworks 🎇
The other ensured they didn’t stop 🤝

🎥 Vaibhav Sooryavanshi & Dhruv Jurel on an 𝗲𝘃𝗲𝗻𝗶𝗻𝗴 𝘁𝗼 𝗿𝗲𝗺𝗲𝗺𝗯𝗲𝗿 in pink 🩷 🌟 – By @Moulinparikh and @ameyatilak #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR | @rajasthanroyals…

— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2026

वैभव सूर्यवंशी पुढे म्हणाला की, “जर संघाला मोठ्या खेळीची गरज असेल, तर मी तीसुद्धा खेळू शकतो. जर संघाला मोठ्या फटक्यांची गरज असेल, तर मी तेही करू शकतो. माझे लक्ष फक्त संघासाठी योगदान देण्यावर आहे.” आता क्वॉलिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना 29 मे रोजी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबीशी सामना करेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in