• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विराट कोहलीने रॅगिंगचा भन्नाट किस्सा केला शेअर! मुनाफ आणि भज्जीने सचिनच्या नावाने अशी घेतली होती फिरकी

August 17, 2026 by admin Leave a Comment


विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव.. आजवर त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्याने  मागे वळून पाहिलं नाही. विराट कोहलीने काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडलेही,,. विराट कोहली आज भारतीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरनंतरचा नावाजलेला चेहरा आहे. त्याचं फिटनेस आणि क्रिकेटचं ध्येय नवोदीत तरूणांना प्रेरणा देते. पण विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरूवात एका मजेशीर प्रकाराने झाली हे तुम्हाला माहिती आहे का? भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची भेट कशी झाली? या मागे एक मजेशीर किस्सा आहे. हा काही ऐकीव किस्सा वगैरे नाही तर खुद्द विराट कोहलीने सांगितला आहे. नेमकं काय झालं होतं ते जाणून घेऊयात..

विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध अँकर गौरव कपूरने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात विराट कोहलीसोबत संवाद साधला होता. त्या मुलाखतीतील पहिल्या दिवशी विराटसोबत काय घडलं होतं? ही क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे. विराट कोहली 2008 मध्ये भारतीय संघात आला होता. तेव्हा विराट कोहली नवखा असल्याने ड्रेसिंग रूमध्ये खूपच शांत असायचा. दिग्गज खेळाडूंबाबत त्याच्या मनात आदरयुक्त भीती होती. पण पहिल्याच दिवशी युवराज सिंग, हरभजन सिंग, मुनाफ पटेल आणि इरफान पठाण यांनी विराट कोहलीची फिरकी घेतली. भारतीय संघात राहायचं असेल तर सचिन तेंडुलकर यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावे लागतात, असं सांगितलं. ही एक प्रथा असल्याचं विराट कोहलीच्या मनावर बिंबवलं आणि त्याचाही त्यावर विश्वास बसला.

🚨 Virat Kohli: “Yuvraj Singh, Irfan & Munaf completely brainwashed me.”🚨

Host: “What did Yuvraj and Irfan do to you in the dressing room?”

Virat Kohli: They told me that if I didn’t, my career could be in trouble. They warned me something really bad would happen if I refused.… pic.twitter.com/mVcWVp1zqq

— Mahi Patel (@Mahi_Patel_07) August 17, 2026

विराट कोहलीच्या मनाची बरीच घालमेल झाली होती. कसं पण करून सचिनच्या पाया पडायचं हे त्याने मनात पक्कं केलं.  ड्रेसिंग रूममध्ये सचिन तेंडुलकरला पाहिल्यानंतर लगेचच त्यांच्याजवळ गेला.  तसेच वाकून पाया पडणार इतक्यात सचिनने त्याला थांबवलं. सचिन म्हणाला, हे काय करत आहेस? तेव्हा विराट कोहली म्हणाला की, सिनियर्स खेळाडूंनी तसं सांगितलं होतं. त्यावर सचिन हसत म्हणाला की, तुझी रॅगिंग झाली आहे आणि त्यांनी तुला मूर्ख बनवलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in