• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमानात तिकीट घेतल्यानंतरही पसंतीच्या आसनासाठी पैसे द्यावे लागतात? काय आहे नियम…

June 11, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्ही कधी विमानाची तिकीट बुक केली असेल तर कदाचित तु्मच्याही मनात एक प्रश्न नक्की आला असेल की तिकीटाचे भाडे भरल्यानंतर एअरलाईन कंपनी तुमच्याकडे पसंतीचे आसन निवडण्याचे वेगळे पैसे मागते का ? यामुळे अनेक जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल पसंतीच्या सीटचे पैसे देणे गरजेचे आहे का ? आणि जर पैसे दिले नाही तर सीट मिळणार नाही ? काय नेमका नियम असतो ते पाहूयात…

जेव्हा तुम्ही विमानाची तिकीट खरेदी करता. तेव्हा त्यात तुमचा प्रवासाचा परवाना आणि आसन दोन्हीचा समावेश असतो. मात्र, जर तुम्हाला तुमच्या पसंदीचे आसन हवे असेल तर मात्र तुमच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले जाऊ शकतात.
जेव्हा तुम्ही विमानाचे तिकीट खरेदी करता, तेव्हा त्या तिकीटातच आसन त्यावेळी जे अव्हेलबल आहे ते दिले जाते. म्हणजे एअरलाईन तुमच्या आसनाची तजवीज केल्या शिवाय तुमच्याकडून तिकीटाचे पैसे आकारणार नाही. तुम्ही तुमची सिट निवडलेली नसेल तर तुम्हाला आपोआप उपलब्ध असलेले एक आसन अलॉट केले जाते. यावर कोणताही अतिरिक्त भार आकारलेला नसतो. मात्र, आसन तुम्ही तुमच्या पसंतीनुसार निवडलेले असेल तर मात्र, तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतात.

पसंदीच्या आसनाचे पैसे का ?

वास्तविक, एअरलाईन्स काही खास आसनांना, ‘पसंतीच्या सीट’ वा ‘प्रेफरेंशियल सीट’ म्हणून विकते. यात विंडो सिट, पुढच्या रांगेची सीट वा जास्त लेग रुम असणारी आसने आणि इमर्जन्सी एक्झिटच्या शेजारची आसने यांचा समावेश असतो. जर तुम्ही तुमच्या पसंतीची एखादी खास सिट आरक्षित करु इच्छीत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात.

जर तुम्ही तुमचे आसन निवडलेले नसेल तर एअर लाईन उपलब्ध आसनांपैकी कोणतीही आसन देऊ शकते. अनेकदा प्रवाशांचा विंडो सिट देखील अतिरिक्त पैसे न देता मिळू शकते. तर कधी-कधी मधली सिट देखील मिळू शकते.

आसनांसाठी एक्स्ट्रा फी घेण्याचा नियम काय ?

अलिकडच्या वर्षात सीट सिलेक्शन फी संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर भारताच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) एअरलाईन्सच्या सीट वाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेच्या ध्यान राखण्याचे निर्देश दिले आहेत. DGCA च्या नियमांनुसार एअरलाईन्सच्या एकूण आसनांपैकी कमीत कमी ६० टक्के हिस्सा विना अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत द्यायचा असतो. तसेच संपू्र्ण कुटुंबाला वा एकच PNR वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकत्र बसवण्यावर जोर दिला आहे.

यासाठी पुढच्या वेळी फ्लाईट तिकीट बुक करताना घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला स्पेशल सीटची गरज नसेल तर विमानात प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची बिल्कुल गरजेचे नाही. एअरलाईन्स तुमच्या प्रवासासाठी आसन देणे बंधनकारक आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in