• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमानातील सर्वात सुरक्षित आणि खास सीट कोणतं? 500 वेळा बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं सीक्रेट

April 25, 2026 by admin Leave a Comment


अनेकांना विमानातून प्रवास करणं खूप आवडतं, मात्र इतर मार्गाच्या तुलनेत विमानाचा प्रवास हा खूप जास्त खर्चिक असल्यामुळे प्रत्येक जण खूप सहजतेनं किंवा वारंवार विमानाने प्रवास करू शकतो असं होतं नाही, अनेकांचं तर विमानाने प्रवास करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं. परंतु असेही अनेक जण असतात जे आपल्या पहिल्या विमान प्रवासासाठी खूप उत्सुक असतात. ते पैशांची बचत करून आपल्या पहिल्या विमान प्रवासाचं नियोजन करतात. अशा व्यक्तींसाठी त्यांचा पहिला विमान प्रवास हा एक कधीही न विसरू शकणारा अनुभव असतो. तो जर आणखी खास झाला, त्यांच्या प्रवासात कोणताही व्यत्यय आला नाही तर त्यांचा आनंद आणखी वाढतो. तुम्ही विमानाने पहिल्यांदा प्रवास करणार असाल किंवा यापूर्वी देखील तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला तरीही तिकीट बुक करताना तुमच्या मनात सर्वात आधी हा प्रश्न निर्माण होतो की? आपण विमानातील कोणतं सीट बुक करावं? याबद्दल एका व्यक्तीनं आपले काही खास अनुभव शेअर केले आहेत, ज्या व्यक्तीने विमानांच्या सीटबाबत आपला अनुभव सांगितला आहे, त्या व्यक्तीने तब्बल 500 वेळे विमानातील बिझनेस क्लासने प्रवास केला आहे.

सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार रिचर्ड रॉबिन्स असं या व्यक्तीनं नाव आहे. या व्यक्तीने 2010 पासून ते आतापर्यंत त्याच्या आयुष्यात 500 पेक्षा अधिकवेळा विमानाने प्रवास केला आहे. या व्यक्तीने आपल्या आयुष्यात तब्बल 1,585,148 किलोमीटरचा प्रवास विमानाने केला आहे. या व्यक्तीने बिझनेस क्लास आणि इंटरनॅशनल फस्ट क्लास अशा दोन्ही क्लासमधून प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याला आलेले काही खास अनुभव त्याने नुकतेच शेअर केले आहेत. तसेच विमानातील सर्वात सुरक्षित आणि खास सीट कोणतं असतं? असा प्रश्न अनेकांना पडतो त्याचं उत्तर देखील रिचर्डने दिलं आहे.

रिचर्डने विमानातील सर्वात सुरक्षित आणि खास सीटबाबत बोलताना असं म्हटलं की, तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या प्रवासाच्या ठिकाणी पोहोचल्यावर काय करणार आहात, म्हणजे एखादी महत्त्वाची मिटिंग अटेंन्ड करणार आहात की आराम करणार आहात, यावरून तुम्ही ठरू शकता की तुम्हाला कोणतं सीट निवडायचं आहे. जर तुम्ही प्रवासानंतर एक दिवस आरामच करणार असाल तर तुम्ही विमानातील कोणतंही सीट निवडू शकता. मात्र जर तुम्हाला लगेचच कामाला सुरुवात करायची असेल तर अशावेळी तुम्ही जे सीट हे आकाराने मोठं आहे, ज्याच्यावर तुम्ही सहज आरामात बसू शकता, असंच सीट निवडा, त्यामुळे तुम्ही प्रवासानंतर देखील प्रेश राहाल असा सल्ला रिचर्डने दिला आहे. तो पुढे असंही म्हणतो की अनेक विमानांमध्ये द रूम नावाची एक खास सीट असते, ही सीट तुम्ही बुक केली तर कोणाचाही व्यत्यय न येता तुम्ही आरामात प्रवास करू शकतात. मी देखील याच सीटाला प्राधान्य देतो. त्यामुळे तुम्ही प्रवासानंतर देखील आनंदी राहता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला
  • भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…
  • GK : 3 खंडांनी वेढलेला एकमेव महासागर, भारताशी आहे खास नातं
  • Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच
  • IPL 2026, DC vs PBKS: पंजाब किंग्सने विक्रमी 265 धावा गाठल्या, दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in