• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आता डोमिसाईलची गरज नाही, केंद्राचा मोठा निर्णय

June 25, 2026 by admin Leave a Comment


सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. यामुळे अर्ज करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहजपणे अर्ज करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिष्यवृत्ती प्रक्रिया अधिक सुलभ होणार

सरकारी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला सादर करणे बंधनकारक होते. या दाखल्यामध्ये विद्यार्थ्याच्या कायमस्वरूपी निवासस्थानाची माहिती असते, म्हणजे तो कोणत्या राज्याचा आणि कोणत्या भागाचा रहिवासी आहे हे स्पष्ट होते. मात्र, हा दाखला मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत होता. वेळेवर दाखला न मिळाल्याने अनेकदा अर्जाची मुदतही निघून जात असे. त्यामुळेच आता सरकारने नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरापासून दूर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

आपल्या देशात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर राहतात. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी रहिवासी दाखला मिळवण्यासाठी पुन्हा आपल्या गावी जावे लागत होते. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असे मात्र आता अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याने अशा विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार असून त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

पालकांनाही मिळणार दिलासा

रहिवासी दाखला मिळवण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही विविध धावपळ करावी लागत होती. रहिवासी दाखला मिळवण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये जावे लागत असे आणि काही वेळा काम लवकर करून घेण्यासाठी अतिरिक्त खर्चही करावा लागत होता. मात्र नव्या बदलामुळे अशा प्रकारच्या अडचणी आणि खर्चातून विद्यार्थी व पालकांची सुटका होणार आहे.

सरकारचा उद्देश काय?

सरकारच्या या निर्णयामागील मुख्य उद्देश शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करणे हा आहे. विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला मिळवण्यासाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये आणि पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीची मदत वेळेत पोहोचावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे अर्ज प्रक्रियेला गती मिळेल आणि विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या धावपळीऐवजी आपल्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे, या निर्णयाचा फायदा देशातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL : टीम इंडियाचा फॉलोऑन देण्याचा निर्णय चुकणार का? चौथ्या आणि पाचव्या दिवसाचं गणित काय?
  • Rohit Pawar : 40 लाख रुपयांना पेपर फोडला, रोहित पवार यांचा MPSC पेपर फुटीवर खळबळजनक दावा
  • बॉयफ्रेंडचा कोयत्याने हल्ला, बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in