• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘विकतच घेतील असं वाटलं, एका रात्रीसाठी…. ‘मिर्झापूर’नंतर अभिनेत्रीच्या चारित्र्याला लागलेला डाग! पुरुषांकडून विचित्र मागणी…

August 23, 2026 by admin Leave a Comment


‘मिर्झापूर’ ही सीरिज कोणा पाहिलं नसेल असं क्वचितच कोणी असेल. आज ‘मिर्झापूर’ मधील पात्र देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. या सीरिजमुळे अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली. सीरिजमध्ये अभिनेत्री अनंग्शा बिस्वास हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली. सीरिजमुळे अभिनेत्री प्रसिद्धी झोतात तर आली, पण याची अभिनेत्रीला मोठी किंमत मोजावी लागली. एका मुलखतीत अभिनेत्रीने आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ‘मिर्झापूर’ सीरिजमधील अभिनेत्रीची भूमिका पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्याकडे विचित्र मागणी केली.

अभिनेत्री म्हणली, ‘मिर्झापूर मधील माझी भूमिका पाहिल्यानंतर लोक माझ्याबद्दल नको ते विचार करु लागले होते. त्यानंतर माझ्याकडे विचित्र मागणी देखील करण्यात आली. पहिल्या सीझननंतर मी पूर्णपणे त्रासली होती. कारण हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं. मला अत्यंत विचित्र मेल आणि कमेंट केले जात होते. लोकांनी मला अपमानीत केलं.’

‘मझ्याबद्दल घाणेरड्या गोष्टी ऐकल्यानंतर मला फार मोठा धक्का लागलेला. कारण माझ्यासाठी माझं काम सरस्वती आहे. मला कळत नव्हतं लोकं माझ्याबद्दल असं का बोलत आहेत. त्यानंतर मला हळू – हळू कळलं की, सगळेच तुमच्या कामाचं कौतुक करतील असं नाही. काही लोकांना माझं काम आवडलं, तर काही लोकांनी माझ्या कामाचा विरोध केला.

‘खऱ्या आयुष्यात मी झरीना सारखी नाही. पण सीरिज पाहिल्यानंतर लोकांना असं वाटलं की, ते मला विकत घेऊ शकतील. मला मेसेज येऊ लागलेले, एका रात्रीचे किती पैसे घेशील.. तू दोन दिवस आमच्यासोबत परदेशात चल… माझा मेल बॉक्स असा मेसेजने भरलेला होता. मी कधी या गोष्टीबद्दल बोलले देखील नसते. पण लोकांचे विचार मला बदलायचे आहेत. आम्ही आमची भूमिका बजावत आहोत. पण खऱ्या आयुष्यात तशी नाही. ‘

‘मिर्झापूर’ पाहिल्यानंतर लोक मला ‘झरीना’ म्हणूनच पाहू लागले. मी केवळ एक भूमिका साकारत होते. मला वाटतं की, मी ती व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारली, म्हणूनच लोकांना वाटलं की मी खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. पण लोकांनी जर थोडी अधिक संवेदनशीलता दाखवली असती, तर कदाचित त्यांनी माझ्या अभिनयकौशल्याची नक्कीच दाद दिली असती.”, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in