• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वडील कामावरुन घरी आले, दरवाजा उघडून आत जाताच समोरचं दृश्य बघून पायाखालची जमीन सरकली, पुण्यातली घटना

August 22, 2026 by admin Leave a Comment


सर्वकाही सुरळीत आणि आनंदी दिसत असताना मध्येच असं काही भयानक घडतं… तेव्हा सगळे म्हणतात, या आनंदी कुटुंबाला नेमकी नजर तरी कोणाची लागली. असं काही पुण्यात घडलं आहे. वडील काम संपवून घरी आले पण दरवाजा उघडताच समोर जे दृश्य आलं, ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सकरली. शुक्रवारी बारामतीमधील तांदूळवाडीतील दादा पाटीलनगर परिसरात एकाच घरातून माय-लेकाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. मुलाचं नाव विवेक विजय गावडे असून त्याचं वय फक्त 17 वर्ष होतं, तर आई रमा विजय गावडे याचं वय 41 वर्ष होतं. दोघांचा मृत्यू झाल्याने नेमकं झालं तरी काय? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय रामदार गावडे , हे रमा यांचे पती असून ते बारामती एमआयडीसीतील जीटीएन कंपनीत काम करतात. गुरुवारी रात्री ते कामासाठी बाहेर गेले आणि शुक्रवारी सकाळी घरी परतले. घरी आल्यानंतर घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे ते पत्नी आणि मुलाला सतत आवाज देत होते. पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी शेजारील सूरज भीमराव शिंदे यांना बोलावून घेतलं.

सूजर भीमराव यांना बोलावून घेतल्यानंतर दरवाजा उघडून घरात पाहिलं असतं, एकात घरात माय – लेकांचा बॉडी आढळली. मिळालेल्या माहितीनुसार, रमा गावडे खिडकीजवळ पाठीवर पडलेल्या अवस्थेत होत्या. अशात विजय यांनी पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण कोणतीही हलचाल जानवली नाही.. त्यांच्या मानेवर काळसर व्रणही दिसून आले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.

आता माय – लेकाने  स्वतःचे प्राण का संपवले, की त्यामागे काही मोठं कारण आहे… याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी आता कसून चैकशी करत आहेत.  मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम आणि पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे. तर बारामती तालुका पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला असून, कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे. आता याप्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in