• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वडिलांनी गिलला सहा वर्षाच्या क्रिकेटरचे व्हिडीओ दाखवले, पण का? भारतीय कर्णधाराने केला खुलासा

August 2, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटमध्ये शुबमन गिल आता एक खूप मोठं नाव आहे. गेल्या काही वर्षात शुबमन गिलने अनेक विक्रम रचले आणि भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. त्याची ही कामगिरी सतत पुढेही सुरू आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर विश्वास टाकून वनडे आणि कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे. पण गिलचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न त्याच्या वडिलांनी पाहिलं होतं आणि शुबमन गिलने ते प्रत्यक्षात साकार केलं. शुबमन गिलला क्रिकेटचे धडे घरातूनच मिळाले. कारण त्याचे वडिल त्याचे पहिले कोच आणि मार्गदर्शक आहेत. आता शुबमन गिलने क्रिकेटमध्ये एक मोठी उंची गाठली आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिलने वडिलांबाबत एक खुलासा केला आहे. शुबमन गिल म्हणाला की, वडिल फक्त भारतीय कर्णधाराचे व्हिडीओ नाही तर छोट्या क्रिकेटपटूंचे व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि दाखवतात.

शुबमन गिल वडिलांबाबत काय म्हणाला?

पंजाब क्रिकेट असोसिएशनने शेर ए पंजाब टी20 लीग या स्पर्धेच्या नव्या पर्वाचं उद्घाटन शुबमन गिलच्या हस्ते केलं. यावेळी शुबमन गिल मोहलीतील पीसीए स्टेडियममध्ये हजर होता. या कार्यक्रमात शुबमन गिलने आपल्या कारकि‍र्दीत वडिलांचं योगदान आणि त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या आवडीविषयी सांगितलं. गिलने वडिलांकडून क्रिकेटचे धडे गिरवल्याचं सांगितलं. गावातील त्यांच्या शेतात प्रथम क्रिकेटचं बाळकडू पाजल्याचं त्याने या कार्यक्रमात सांगितलं. वडिलांप्रती कृतज्ञ असल्याचं सांगत त्यांच्याबाबत न माहिती असलेला किस्सा त्याने सर्वांसमोर शेअर केला.

VIDEO | Mohali, Punjab: At the launch of the Sher-e-Punjab T20 League, India captain Shubman Gill, says, “I think my father always had a dream of seeing me play cricket. We also run a free cricket academy in our village so that children from the nearby areas can come and play… pic.twitter.com/foU7s3pORi

— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2026

शुबमन गिल म्हणाला की, ‘मी क्रिकेट खेळावं असं माझ्या वडिलांचं नेहमीच स्वप्न होतं. आम्ही आमच्या गावात एक अकादमीसुद्धा चालवतो, जिथे आजूबाजूच्या परिसरातील मुले विनामूल्य शिकतात. जेव्हा कधी माझ्या वडिलांना वेळ मिळतो, तेव्हा ते अकादमीत जाऊन मुलांना खेळताना पाहतात. कधीकधी ते मला व्हिडिओ दाखवतात, कधी फलंदाजी करणाऱ्याचा, तर कधी क्षेत्ररक्षण करणाऱ्याचा, अगदी ते मूल फक्त सहा ते सात वर्षांचं असलं तरीही. क्रिकेटवरील त्यांच्या प्रेमामुळे आणि ध्यासामुळेच मी आज इथे बसलो आहे.’

श्रीलंकेत खऱ्या अर्थाने कसोटी

कसोटी चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी श्रीलंका दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली तर आणि तरच अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलसमोर मोठं आव्हान असणार आहे. भारताचा श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in