• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वडिलांच्या अंत्यविधीला मुलगा हजर नसणार ? इस्रायलच्या हल्ल्याची भीती की अन्य कारण

July 2, 2026 by admin Leave a Comment


इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर अखेर चार महिन्यांच्या अंतराने इराणमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या दफनविधी सोहळा काही दिवस चालणार आहे. मात्र, वडिलांच्या सुपूर्द ए खाक विधीला त्यांचा मुलगा आणि सध्याचे प्रमुख मोजताबा खामेनी हे उपस्थित राहणार का या संदर्भात आता वेगळीच माहिती समोर आली आहे. मोजताबा खामेनी यांचे प्रतिनिधी अयातुल्लाह हकीम इलाही यांच्या हवाल्याने एक वृत्त दिले आहे.

इराणवर २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनी यांचा त्याच्या कार्यालय परिसरात बॉम्बफेकीत मृत्यू झाला होता. त्यात त्यांचे जवळचे अनेक नेते आणि नातेवाईक देखील ठार झाले होते. या हत्येनंतर इराणच्या सर्वेसर्वा आयातुल्ला खामेनी यांच्या पार्थिवावर चार महिन्यांनंतर अंत्यसंस्कार केले जात आहेत. आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराला आता त्यांचा मुलगा हजर राहणार का असा सवाल केला जात असताना आयातुल्ला खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला त्यांचे पूत्र मोजताबा हजर राहणार नसल्याचे वृत्त अल जझीरा वृत्त वाहिनीने प्रतिनिधि अयातुल्लाह हकीम इलाही यांच्या हवाल्याने दिले आहे.

हा निर्णय मोजताबा यांच्या सुरक्षेसाठी घेतलेला आहे. जरी अमेरिका सोबत शांतता करार झाला असला तरी दोन्ही देशांचा एकमेकांविरोधात अविश्वास कायम आहे. तसेच इस्रायलने अमेरिकेला न जुमानता लॅबनॉन येथे हल्ले सुरुच ठेवले आहेत.मोजताबा यांच्या शिवाय या सोहळ्यात इराण आणि जगभरातील लोक उपस्थित राहणार आहेत.

जमीनीपासून आकाशापर्यंत कडेकोट सुरक्षा

इराणच्या सैन्यदलाचे प्रवक्ते जनरल मोहम्मद अकरमिनिया यांनी सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारचा विधीला प्रचंड सुरक्षा असणार असल्याचे म्हटले आहे.सैन्यदलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केलेल्या आहेत. एअर डिफेन्स फोर्सचे देशातील हवाई क्षेत्रावर करडी नजर असणार आहे. सर्व परदेशी उड्डाणांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. इराणच्या नेत्याला सुपूर्द ए- खाक करण्यासाठी भव्य आणि सन्मानजनक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातून कोण जाणार ?

आयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर ९ जुलै रोजी मशहद येथे अंत्यसंस्कार केले जातील. ही अंत्ययात्रा ४ जुलै रोजी सुरु होणार आहे.भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही नेते ३ जुलै रोजी इराणसाठी रवाना होणार आहेत.

आयातुल्ला ठार, तर मोजताबा झाले होते जखमी

२८ फेब्रुवारी रोजी, इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या यांच्या संयुक्त कारवाईत मृत्यू झाला होता. त्यांचे पुत्र, सध्याचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनी हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तेव्हापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत.त्यांचा संदेश केवळ व्हायरल केला जात आला आहे.मोजताबा यांची प्रकृती खूपच खालावली आहे आणि त्यामुळेच ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले असा दावा इस्रायली आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांनी अनेकदा केला आहे, आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर तरी मोजताबा समोर येतील अशी आशा होती. मात्र, हा दावा आता फेटाळण्यात आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अशोक सराफ यांचं 79 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न; कोर्टात एकमेकांना घातल्या वरमाळा
  • डॉक्टर बनून महिलांचं शरीर… सेजल जाधवनंतर आणखी एकाचा वादग्रस्त व्हिडीओ; संतापाची लाट उसळताच…
  • Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
  • GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
  • Aamir Khan And Gauri Wedding : वाजवा रे वाजवा… आमिरच्या तिसऱ्या लग्नाला थेट विदेशी पाहुणे, 150 वऱ्हाडींचाही समावेश; लग्न या ठिकाणी होणार…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in