• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘वंदे मातरम्’ वाद तापला, शर्मिला टगोर यांच्यावर भडकल्या कंगना, हिंदू – मुस्लीम विचारसरणीवर मोठं वक्तव्य

August 21, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या दिग्गज गायिका शर्मिला टागोर यांनी नुकताच, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी ‘वंदे मातरम्’ ची उर्वरीत कडवी गाणं कठीण आहे… असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी संताप व्यक्त करत, शर्मिला यांना एक सल्ला दिला आहे. सांगायचं झालं तर, ‘वंदे मातरम्’ बद्दल शर्मिला टागोर यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. पण त्यांचं वक्तव कंगना यांना खटकलं आहे. अशात सोशल मीडियावर पोस्ट करत कंगना यांनी शर्मिला टागोर यांच्यावर निशाणा साधला आहे. आता कंगना यांचं वक्तव्य चर्चेत आली आहे.

कंगना राणौत यांनी नुकताच शर्मिला टागोर यांचा व्हिडीओ शेअर करत, त्यांना सल्ला दिला आहे. ”वंदे मातरम्’बाबत शर्मिला टागोर यांनी आपली हरकत नोंदवली आहे, याचं मी स्वागत करते. पण आश्चर्च याचं वाटतं की, एक कलाकार असून कला / कवितांबद्दल त्यांचे विचार असे मर्यादित कसे असू शकतात? अपेक्षित परिणाम साधण्यासाठी कवी विविध कल्पक घटकांचा वापर करतात; ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेचं प्रतीक आहे आणि बंकिम चंद्र देशाला आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यास प्रेरित करतात.’

शर्मिला यांना सल्ला देत कंगणा म्हणाल्या, ‘कृपा करुन हिंदू-मुस्लीम विचारसरणीतून बाहेर या. मला तुम्ही फार आवडता. मला तुमच्या गोष्टी आवडतात. तुमच्या घट्ट मिठीची देखील मला काहीही अडचण नाही. जर एखादा धर्म केवळ एकाच ईश्वरापुरता आणि एकात प्रकारच्या अभिव्यक्तीसाठी ते देखील पुरुषप्रधान पद्धतीपुरता मर्यादित असेल, तर मला खंत वाटते, पण त्याची पर्वा तरी कोणाला आहे?’

सांगायचं झालं तर, कंगना यांनी पोस्ट लिहिण्यामागे शर्मिला टागोर यांचं नेमकं काय म्हणणं काय होत, तर ‘आयएएनएस’शी बोलताना त्यांनी ‘वंदे मातरम’ वादावर आपलं मत मांडलं होतं. विशिष्ट धर्मावर श्रद्धा असलेल्या लोकांसाठी ‘वंदे काली’ किंवा ‘वंदे दुर्गा’ यांसारखे शब्दप्रयोग करणं कठीण असतं, त्यामुळे भारतातील सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणायचं असेल, तर या गीताची पहिली दोन कडवी उत्तम आहेत. असं वक्तव्या शर्मिला टागोर यांनी केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in