• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वंदे मातरम् पूर्ण न म्हटल्याने प्रणिती शिंदे वादात, नव्या मोठ्या वादाला तोंड, सोनिया गांधींनंतर..

August 16, 2026 by admin Leave a Comment


सोनिया गांधींनंतर आता खासदार प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमातही पूर्ण वंदे मातरम् न गायल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात काँग्रेसच्या वतीने सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम् न गाता काही कडवेच गायल्याचे पाहायला मिळाले. ज्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. सोनिया यांनी यांच्या पावलावर पाऊल प्रणिती शिंदे यांनी टाकल्याचे सांगितले जातंय. दिल्लीतील कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी पूर्ण वंदे मातरम् गाण्यापासून रोखल्याचा आरोप भाजपने केला. आता त्याच वादात प्रणिती शिंदे अडकल्या आहेत. त्याचप्रमाणे सोलापुरातील काँग्रेसच्या कार्यक्रमातही पूर्ण वंदे मातरम् गायले गेले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त आहे. भाजपा या मुद्द्यात आक्रमक होत आहे.

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनानिमित्त GNZ सोबत सामूहिक राष्ट्रगानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत उपस्थितांनी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन केले. मात्र, या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वाद निर्माण झाला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक  कायदा 2026 ऑगस्ट 2026 मध्ये अंमलात आला. या नवीन कायद्यानुसार, जन गण मन प्रमाणेच वंदे मातरमला कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. वंदे मातरम गाण्यात हेतुपुरस्सर अडथळा आणला तर अपमान करणे, हे कायद्यानुसार शिक्षेस पात्र ठरते. सोनिया गांधी यांनी वंदे मातरम पूर्ण गायले नाही, त्यांनी मध्येच थांबवल्याचा दावा केला जात आहे.

आता तसाच आरोप खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरही करण्यात आला. प्रणिती शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या वादावर आता प्रणिती शिंदे नक्की काय उत्तर देतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अनेकांनी प्रणिती शिंदे यांनी वंद मातरम् गाणे पूर्ण होऊ दिले नसल्याने संताप व्यक्त केला. सोनिया गांधी यांचा यादरम्यानच एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून भाजपा आरोप करत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in