
अभिनेत्री काजोल हिची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने ग्लॅमरस फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. आता काजोल हिच्या स्टाईसोबतच तिच्या कॅप्शनची देखील चर्चा सुरु असते.
आता देखील काजोल हिने हटके लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते, काजोलच्या प्रत्येक लूकची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
आता देखील फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, जेव्हा लोक 'मोठ्या माणसासारखं वागा' असं म्हणतात तेव्हा मला त्याचा खूप राग येतो. तुम्ही हल्ली मोठ्या माणसांना पाहिलंय का??? हा तर खूपच वाईट सल्ला आहे!
सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल झगमगत्या विश्वात पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.




Leave a Reply