• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लोकप्रिय क्रिकेटरच्या बायकोचा पहिला नवरा किराणा दुकानदार, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट अन्…

June 14, 2026 by admin Leave a Comment


सेलिब्रिटी आणि क्रिकेटर त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील अशा क्रिकेटरच्या बायकोच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, जिचं पहिलं लग्न किराण दुकान मालकासोबत झालं होतं. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. दोन मुलांच्या जन्मानंतर तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिची ओळख क्रिकेटरसोबत झाली. पहिल्या भेटीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. मुलीच्या जन्मानंतर दोघे विभक्त राहत आहेत, पण त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. सध्या ज्या क्रिकटपटूच्या पत्नीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही, हसीन जहाँ आहे. भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यासोबत तिचं दुसरं लग्न आहे…

हसिन जहाँ हिच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, हसीन जहाँ हिचं पहिलं लग्न 2002 किराणा दुकानदारासोबत केलं होतं. 2002 मध्ये हसीन हिने प्रियकर सैफुद्दीन याच्यासोबत लग्न केलं. दोघे 2010 पर्यंत एकत्र राहिले. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, हसीन हिला पुढे शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण सासरच्या मंडळींचा नकार असल्यामुळे हसीन जहाँ हिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. हसीन आणि सैफुद्दीन यांना दोन मुलं आहेत.

पहिल्या घटस्फोटानंतर हसीन हिने केकेआर टीममध्ये प्रवेश केला. क्रिकेटच्या मैदानावर हसीन हिने चिअर गर्ल म्हणून करियरला सुरुवात केली. 2012 मध्ये हसीन आणि शमी यांची ओळख झाली. तेव्हापासून शमी आणि हसीन यांची लव्हस्टोरी सुरु झाली. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर एका मुलीचं जगात स्वागत केलं. पण मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

रिपोर्टनुसार, हसीन हिने तिच्या पहिल्या लग्नाचं सत्य शमीपासून लपवून ठेवलं होतं. त्यानंतर दोघांचे वाद वाढल्याच्या चर्चा रंगल्या. हसीन हिने पतीवर फसवणुकीसह अनेक गंभीर आरोप केले. तेव्हापासून शमी आणि हसीन विभक्त राहात आहेत. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ कायम पतीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप करताना दिसते. हसीन एक मॉडेल आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Earthquake : जगात हाहाकार… पहाटे पहाटे आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत
  • Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांचा दावा खरा, फक्त सिया आणि चेतन नाही तर तिसरा व्यक्तीही… मोठा ट्विस्ट..
  • Ketan Agarwal Murder Case : साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंत… केतन अग्रवाल प्रकरणात कधी काय काय घडलं?
  • जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट, मोठी खळबळ
  • Horoscope Today 25th June 2026 : जे नोकरीच्या शोधात मिळणार गुड न्यूज, दिखाऊपणा टाळा, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं आजचं भविष्य !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in