• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नापूर्वीच हनीमून, 20 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर, वयामुळे घेतला मोठा निर्णय

August 16, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अनुराग गेल्या 10 वर्षांपासून अभिनेत्री शुभ्रा शेट्टी हिला डेट करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुराग कश्यप याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असून गर्लफ्रेंड आणि दिग्दर्शकाच्या वयात तब्बल 20 वर्षांचं अंतर आहे. नुकताच झालेल्या एका मुलखतीत अनुराग आणि त्याच्या गर्लफ्रेंडने मोठं वक्तव्य केलं आहे. अनुराग याच्या गर्लफ्रेंडचं नवा शुभ्रा शेट्टी आहे. दोघांनी लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्याा मुलाखतीत दोघांनी लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर अनुराग याने सांगितलं की, शुभ्रा हिला लग्नावर विश्वास नाही. ‘मी तिच्यासोबत फार आनंदी आहे आणि मला तिच्यासोबत राहायचं आहे. त्यामुळे तिच्यासाठी काहीही करावं लागेल मी करेल. आयुष्यात खूप काही आहे. एका वृद्ध व्यक्तीला आणखी कसली सुरक्षा पाहिजे? मला इतकं स्वस्थ राहायचं आहे की, मी ज्यांच्यासोबत प्रेम करतो, त्यांच्यानंतर देखील मला जगायचं आहे. कारण असं नाही झालं तर, त्यानंतर काय होईल? जगाचं हेच सत्य आहे…’

वयाबद्दल अनुराग कश्यप काय म्हणाला?

दिग्दर्शक म्हणाला , ‘अनेकांनी आम्हाला ट्रोल केलं. वयामुळे आमच्यावर थोडं दडपण होतं… माझ्यावर जास्त दडपण होतं. एक वेळ अशी देखील आलेली, मी तिला माझ्यापासून दूर करण्याचा देखील प्रयत्न केला.’ असं देखील अनुराग म्हणाला.

अनुराग कश्यप झाला भावूक…

दोघांचा हनिमून काळ आठवत शुभ्रा म्हणाली, ‘आमच्या हनीमून काळात आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो.. प्रेमात पडणं माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं आणि हे अनुभवल्यानंतर ती आनंदाने अखेरचा श्वास घेऊ शकते.’, शुभ्राचं असं वक्तव्य ऐकताच अनुराग भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने शुभ्राला सांगितलं की, तिला भेटण्यापूर्वी त्याला कधीच मृत्यूची भीती वाटली नव्हती किंवा कार अपघाताच्या शक्यतेचीही चिंता वाटली नव्हती. तो म्हणाला की, आयुष्यात पहिल्यांदाच त्याला जगण्याचं एक कारण सापडलं होतं आणि म्हणूनच त्याला मरायचं नव्हतं. शुभ्राने त्यांच्या नात्याकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन सर्वात सुंदर असल्याचं सांगितलं.

कोण आहे शुभ्रा शेट्टी?

शुभ्रा शेट्टी यापूर्वी अनुरागच्या ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होत्या. अनुराग आणि शुभ्रा यांचा पहिला फोटो 2015 मध्ये समोर आला होता, परंतु 2018 मधील एका मुलाखतीतच त्यांनी शुभ्रासोबतच्या नात्याची जाहीर कबुली दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in