• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…, लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर मनातील खंत बोलूनच दाखवली

August 1, 2026 by admin Leave a Comment


लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पण खऱ्या आयुष्याची सुरुवात देखील लग्नानंतर होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आई – वडिलांच्या घरी मुलींच्या खांद्यावर फार जबाबदारी नसते, पण लग्न झाल्यानंतर एका रात्रीत सर्वकाही बदलतं. अशात त्यामध्ये स्वतःला सामावून घेणं मुलींसाठी काही प्रमाणात कठीण होतं… अशात मराठी अभिनेत्रींबद्दल सांगायचं झालं तर, त्या करियरसोबत कुटुंबाला देखील फार महत्त्व देतात. पण शुटिंगचे तास, प्रवास सततची धावपळ, घराची – कुटुंबियांची जबाबदारी… या सर्व गोष्टी एकत्र सांभाळणं अभिनेत्रींपुढे मोठं आव्हान असतं… तरीही अनेक अभिनेत्री हा वर्क-लाइफ बॅलन्स उत्तम प्रकारे सांभाळताना दिसतात. तर काहींना सासरी गेल्यानंतर त्रासही सहन करावा लागतो.

असंच काही प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी गोडबोले हिच्यासोबत देखील घडलं आहे. एका मुलाखतीत किशोरी हिने लग्न झाल्यानंतर आलेल्या अडचणींबद्दल मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘माहेरी कलेचं वातावरण होतं, त्यामुळे सर्वकाही छान होतं… पण लग्नानंतर ते खूप कठीण झालं… मनोरंजन क्षेत्र खूप टाईम – डिमांडिंग आहे… 12 तासांची शिफ्ट आणि आता तर 13 तासांची झाली आहे… तेव्हा मला धडकीच भरली… मुंबईच जायचं – जायचं… ट्राफीक… दीड ते दोन तास प्रवास… त्यामुळे घराबाहेर 14 तास…’

‘लग्नानंतर सुरुवातीला माझ्या सासरी बिलकूल चाललं नाही. सगळे एकच म्हणायचे, ‘काय तू कायम घराबाहेरच असतेस…? 9 टू 5 जॉब नसल्यामुळे मी त्यांना कसं सांगू की 12 तासांची तर फक्त शिफ्ट असते… त्यानंतर प्रवास… लग्नानंतर सुरुवातीला खूप त्रास झाला… पण आपल्याला समोरच्यांचा विश्वास कमवावा लागतो… जेव्हा त्यांना हळू – हळू माझं काम कळू लागले… तेव्हा त्यांने ते आवडत गेलं… मी टेलिव्हिजनच करायचे… त्यांनी देखील मला हळूहळू समजून घेतलं…’, असं देखील किशोरी यांनी सांगितलं…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Godbole (@kulkishori)

 

किशोरी गोडबोले हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिकांच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक सिनेमांमध्ये देखील किशोरी हिने भूमिका बजावली. सोशल मीडियावर देखील किशोरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in