• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नाच्या 20 वर्षांनंतर उघड झाले पतीचे काळे गुपित, डझनभर मुलांचा निघाला बाप..

August 19, 2026 by admin Leave a Comment


एस. कुलकर्णी : लग्नाला दोन दशके पूर्ण झाल्यावर एका ब्रिटिश महिलेसमोर तिच्या पतीचा असा चेहरा आला, ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गरोदर महिलांविषयी असलेल्या एका अजब आकर्षणापोटी या व्यक्तीने स्वतःची खरी ओळख लपवून शेकडो वेळा स्पर्म डोनेशन केले. आज तो अनेक अनोळखी मुलांचा जैविक पिता असून या धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. संसाराची 20 वर्ष अत्यंत सुखात आणि आनंदात गेल्यानंतर अचानक एक अशी सत्य घटना समोर यावी, ज्यामुळे संपूर्ण पायाखालची जमीनच सरकेल, अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही. ब्रिटनमधून एक अशीच थक्क करणारी आणि नात्यांना हादरवून टाकणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. सुट्ट्यांच्या दिवशी घरात स्वच्छता करत असताना एका 60 वर्षीय महिलेला तिच्या 45 वर्षीय पतीचे एक अत्यंत धक्कादायक गुपित समजले, जो गेली कित्येक वर्षे लपून-छपून एक अजब समांतर आयुष्य जगत होता. या धक्कादायक प्रकरणाची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे.

कपाटातील ‘त्या’ डब्याने उघड केले गुपित
एक महिला घरात काम करत असताना तिला तिच्या पतीच्या कपाटाच्या कोपऱ्यात एक संशयास्पद प्लास्टिकचा डबा आणि काही फाईल्स सापडल्या. कुतूहलापोटी तिने त्या फाईल्स उघडून पाहिल्या असता तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यात तिच्या पतीने वेगवेगळ्या बनावट नावांनी केलेल्या ‘स्पर्म डोनेशन’चे अधिकृत रेकॉर्ड होते.

त्यानंतर जेव्हा तिने पतीला याबद्दल जाब विचारला, तेव्हा तिचे संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाले. तिचा पती कोणत्याही अधिकृत क्लिनिक किंवा रुग्णालयात न जाता, फेसबुकवरील बेकायदेशीर आणि अनरेग्युलेटेड ग्रुप्सच्या माध्यमातून अनेक महिलांना आपले स्पर्म मोफत पुरवत होता.

पैशांची हाव नाही, तर ‘हा’ होता महाविचित्र शौक
सर्वात रंजक आणि धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या पतीने हा प्रकार कोणत्याही पैशांच्या मोहापोटी किंवा समाजसेवेसाठी केला नव्हता. मानसशास्त्रीय तपासणीत आणि महिलेने दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीला एक अत्यंत दुर्मिळ आणि मानसिक विकृती स्वरूपाचा ‘प्रेग्नन्सी फेटिश’ म्हणजेच गरोदर महिलांना पाहण्याचा आणि त्यांना गरोदर करण्याचा एक अजब मानसिक शौक होता. आपल्या याच अतीव आणि अनियंत्रित कामुक इच्छेपोटी त्याने फेसबुकवर स्वतःची खोटी ओळख निर्माण केली होती.

डझनावारी मुलांचा बनला ‘गुमनाम पिता’
मिळालेल्या माहितीनुसार, 6 वर्षांहून अधिक काळ तो या बेकायदेशीर कामात सक्रिय होता. त्याने अनेक गरजू महिलांना वैयक्तिकरित्या किंवा घरगुती सिरींज पद्धतीचा वापर करून स्पर्म दिले होते. महिलेच्या पतीच्याच्या दाव्यानुसार, या माध्यमातून जन्माला आलेल्या मुलांची संख्या 10 पेक्षा कमी आहे; परंतु त्याच्या पत्नीच्या मते, हा आकडा दुहेरी किंवा त्याहून कितीतरी पटीने अधिक असू शकतो. म्हणजेच, तो नकळतपणे बाहेर डझनावारी अनोळखी मुलांचा जैविक आणि गुमनाम बाप बनला होता.

सध्या काय सुरू आहे?
या भयानक खुलाशानंतर महिला मानसिक धक्क्यामुळे काही आठवडे घर सोडून निघून गेली होती. मात्र, मुलांच्या भविष्यासाठी ती पुन्हा घरी परतली आहे. त्यांच्या नात्यात आता पूर्वीसारखा गोडवा राहिलेला नसून, महिलेचा पती सध्या या गंभीर ‘सेक्स ॲडिक्शन’ आणि मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत आणि थेरपी घेत आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in