• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित शर्माचं दणदणीत शतक, तरीही संघातून आऊट? बीसीसीआय निवडकर्त्यांना काय खटकलं?

July 20, 2026 by admin Leave a Comment


India vs England, 3rd ODI Rohit Sharma: लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धचा सामना टीम इंडिया आणि रोहित शर्मा यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया यात काही खास करू शकली नाही आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण रोहित शर्माने दोन सामन्यातील अपयश शतकी खेळीने झाकून टाकलं. त्याने शतक ठोकलं आणि संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण इतर खेळाडूंना काही चांगली खेळी करता आली नाही आणि संघाचा 27 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाने मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कारण या सामन्यापूर्वी त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांनी सोशल मिडिया ढवळून निघाली होती. पण त्याने शतक ठोकलं आणि त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. पण आता रोहित शर्माच्या शतकी खेळीवरही निवडकर्ते खूश नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संघातून आऊट होईल असं बोललं जात आहे.

रोहित शर्माची कोणती बाब खटकली?

भारत इंग्लंड मालिकेचं वृत्तांकन करणाऱ्या भारतीय पत्रकारांच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माला पुढच्या मालिकेत संधी देण्याची इच्छा निवडकर्त्यांना नाही. शेवटच्या सामन्यात धावा करून रोहित शर्माला पुढे संधी देण्याची मनस्थिती नाही. निवडकर्त्यांच्या मते, रोहित शर्मा सुरूवातीच्या सामन्यात फेल जाते आणि शेवटच्या सामन्यात धावा करतो. अशा स्थितीत टीममध्ये त्याची जागी होऊ शकत नाही. रिपोर्टनुसार, भारतीय निवडकर्ते रोहित शर्माचा विचार 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी करत नाहीत. त्याच्या जागी यशस्वी जयस्वाल संधी देण्याची खलबतं सुरू आहेत. सध्या जयस्वाल वनडे संघातून बाहेर आहे. असं असूनही रोहित शर्मा यासाठी तयार नाही. चांगली कामगिरी करून वनडे वर्ल्डकप खेळू इच्छित आहे.

रोहित शर्माने लॉर्ड्सवर शतकी खेळी केल्यानंतर अप्रत्यक्षरित्या बरंच काही बोलून गेला आहे. रोहित शर्मा म्हणाला की, ‘माझं काम आहे देशासाठी चांगलं खेळणं, धावा करणं. जेव्हा मी पदार्पण केलं होतं, तेव्हाही बाहेर अशा चर्चा होत होत्या. मी इकडेच आहे आणि येथेच राहणार. मला मैदानात काय होतं याने मला फरक पडत नाही. माझं काम आहे संघाला योगदान देणं. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या. बोलले नाही तर मजा येणार नाही. माझं काम संघाच्या आत आहे आणि त्यांचं काम बाहेर आवाज करणं आहे.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in