
अभिनेत्री कंगना राणौतला बॉलिवू़ड इंडस्ट्रीत वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 'गँगस्टर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. आता कंगना अभिनयासोबतच राजकारणातही नाव कमावतेय. तिच्या बेधडक वक्तव्यांची चर्चा आजही सोशल मीडियावर होते.
अभिनेत्री कंगना राणौतने 2021 मध्ये 'थलायवी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. या एपिसोडमध्ये असं काही घडलं, ज्याने कपिल शर्माची बोलतीच बंद झाली होती. या एपिसोडदरम्यान कपिलने कंगनाच्या सुरक्षेवरून मस्करी केली होती.
तुझे हिरो जे तुझ्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करतात, ते घाबरून जात नाहीत का”, असा सवाल कपिल कंगनाला करतो. त्यावर ती तिच्याच अंदाजात उत्तर देते. “त्यांची नियत साफ असते, ते तुझ्यासारखा विचार करत नाहीत”, असं म्हणत कंगनाने कपिलची बोलतीच बंद केली होती. यानंतर तो लगेच विषय बदलून कंगनाला खुर्चीवर बसायला सांगतो.
याच एपिसोडमध्ये कंगना एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ब्लॉक होण्याबद्दलही व्यक्त झाली होती. “ही गोष्ट तर खरी आहे, जेव्हा कोरोना नव्हता, तेव्हा मी चांगली व्यस्त असायची. आता कोरोनामुळे माझ्याकडे इतका वेळ आहे की काय सांगू”, असं ती मस्करीत म्हणते. त्यावर एकच हशा पिकतो.
सध्या राजकारणात सक्रिय असलेली कंगना लवकरच 'क्वीन 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या सीक्वेलची कथा पहिल्या भागापासून पूर्णपणे वेगळी असेल. तीच कथा पुढे दिसणार नाही. कंगनाचा 'क्वीन' हा चित्रपट खूप गाजला होता. यातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.





Leave a Reply