• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेल्वे, गॅस सिलिंडर ते यूपीआय, 1 जूनपासून होणार मोठे बदल; समजून घ्या अन्यथा बसेल खिशाला मोठी झळ!

May 31, 2026 by admin Leave a Comment


June Month Rule Change : आता मे महिना संपला असून सर्वांनीच जून महिन्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात नेमकं काय काय कारायचं? आर्थिक व्यवहार कोणते आहेत? याचे गाणित सगळेच करत असतील. परंतु जून महिन्यात बँकिंग, आर्थिक देवाणघेवाण तसेच तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहिती नसतील तर तुमच्या खिशाला मोठी झळ बसू शकते. त्यामुळेच हे नियम काय आहेत? तुम्हाला त्याचा नेमका काय फायदा होईल? ते जाणून घेऊ या…

यूपीआयच्या नियमात बदल

भारतात रोज कोट्यवधीचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होतात. त्यामुळे या व्यवहारात कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी NPCI कडून मोठी खबरदारी घेतली जाते. यावेळी फसवणूक टाळण्यासाठी NPCI ने जून महिन्यात नवा नियम लागू करण्याचा विचार केला आहे. यापुढे यूपीआयने पैसे देताना समोरच्या व्यापाऱ्याचे व्हेरिफाईड नाव दिसेल. यूपीआय फ्रॉड कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गॅस सिलिंडरचा भावही बदलणार?

एलपीजी कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचा भाव बदलतात. त्यामुळे यावेळीदेखील 1 जून 2026 रोजी गॅस सिलिंडरचा नवा दर जाहीर होण्याची शक्यता आहे. 1 मे 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 993 रुपयांनी वाढले. त्यानंतर दिल्लीमध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरचा भाव 3,071.50 रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले. 1 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

भारतीय रेल्वेकडून मेगा ब्लॉक

जून 2026 मध्ये भारतीय रेल्वेकडून मोठा रेल्वे ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमध्ये एकूण 77 रेल्वे रद्द केल्या जाणार आहेत. तसेच अनेक रेल्वेंचे मार्ग बदलले जाणार आहेत. ट्रॅक अपग्रेडेशन आणि नॉन इंटलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

1 जूनपासून बँकेचे नियम बदलणार

अनेक बँका 1 जून रोजीपासून आपल्या वेगवेगळ्या सेवाशुल्कामध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यात एटीएम ट्रान्जेक्शन फी, फ्रई ट्रान्जेक्शन लिमीट, कॅश विदड्रॉल फी यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे नियम काय हे समजून घेऊनच आर्थिक व्यवहार करावेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in