• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेखा याचं प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर? सेलिब्रिटीचा मुलगा थेट म्हणाला, ‘त्यांना पाहिल्यानंतर कोणाला वाटणार नाही की…’

May 23, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही रंगलेल्या असतात. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता अक्षय कुमार याच्यापर्यंत रेखा यांच्या नावाच्या चर्चा होत्या. एक काळ असा देखील होता, जेव्हा रेखा आणि अभिनेते राज बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरलेला. पण त्यांनी कधीच यावर चर्चा केली आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राज बब्बर यांचा मुलगा आर्य याने दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि रेखा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आर्य असं देखील म्हणाला की, ‘वडिलांचं स्मिता पाटील सोबत असलेलं नातं जेव्हा समोर आलं, तेव्हा कुटुंबियांना वाईट वाटलं होतं. पण आता ती गोष्ट आमच्या आयुष्यात फार मागे राहिली आहे.’

राज बब्बर यांच्या खासगी आयुष्याच्या रंगणाऱ्या चर्चांवर आर्य म्हणाला, ‘तेव्हा मी फक्त चार ते पाच वर्षांचा होतो, त्यामुळे मला आठवत देखील नाही की, जेव्हा स्मिता आई माझ्या वडिलांच्या आयुष्यात आली, तेव्हा आमच्या घरात नक्की कसं वातावरण होतं. लोक मला कायम विचारत असतात की, मला याबद्दल कसं वाटतं, पण आता बोलण्यासारखं आणि सांगण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. आमच्यातील प्रत्येक जण आज त्या भावनेसोबत जगत आहे.’ आर्य असं देखील म्हणाला की, आपल्या आई – वडिलांच्या अफेअरबद्दल जाणून कोणाला चांगलं वाटेल…

पुढे विनोदी अंदाजात आर्य म्हणाला, ‘कोणत्या मुलाला अवडेल की, त्याच्या वडिलांचं दुसऱ्या कोणत्या पुरुषासोबत अफेअर होतं? पण असं झालं आणि आता सर्वकाही ठिक आहे. वडील देखील या दुःखातून सावरले आहेत. आयुष्यात कधीच कोणत्या एका गोष्टीचं ओझं घेऊन जगायचं नाही… जे व्हायचं असतं ते होतं… ‘, असं देखील आर्य बब्बर म्हणाला..

आर्य याला राज बब्बर आणि रेखा यांच्या अफेअरबद्दल देखील विचारण्यात आलं. यावर आर्य पूर्ण विचार करुन म्हणाला, ‘जर तुम्ही मला विचारत असाल की तो रेखाकडे आकर्षित झाले होते का? तर त्या इतक्या सुंदर आहेत, कोण होणार नाही? तुम्हाला आकर्षण वाटणार नाही का? मला तर नक्कीच वाटलं असतं. त्यामुळे जर ते आकर्षित झाले होते, तर होऊ दे. हा मानवी स्वभाव आहे. त्यात काय चुकीचं आहे? ‘, असं देखील आर्य म्हणाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in