
रिपोर्टनुसार अभिनेता रितेश देशमुख याच्याकडे जवळपास 140 कोटींची संपत्ती आहे. तर राजा शिवाजी सिनेमासाठी अभिनेत्याने जवळपास 15 ते 18 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा रितेश यानेच केलं आहे.
अभिनेता सलमान खान याने देखील सिनेमा पाहुण्या कलाकारची भूमिका बजावली आहे. सलमान खान याची नेटवर्थ 2 हजार 900 कोटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता रुपेरी पडद्यावर सक्रिय आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन याने 'राजा शिवाजी' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकेचं कौतुक देखील होत आहे.. अभिषेक याची नेटवर्थ 280 कोटी रुपये आहे. तर 'राजा शिवाजी' सिनेमासाठी अभिनेत्याने 6 – 8 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
अभिनेता संजय दत्त देखील एकापेक्षा एक सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्याने 'राजा शिवाजी' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. संजूबाबाची नेटवर्थ 295 कोटी रुपये आहे. तर 'राजा शिवाजी' सिनेमासाठी अभिनेत्याने 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
जिनिलिया हिच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झाल्यास, रिपोर्टनुसार अभिनेत्रीची एकूण संपत्ती 140 कोटी रुपये आहे. तर 'राजा शिवाजी' सिनेमासाठी अभिनेत्रीने 1 ते 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
अभिनेत्री भाग्यश्री हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिची नेटवर्थ 38 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने 'राजा शिवाजी' सिनेमासाठी 1 ते 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
अभिनेत्री विद्या बालन देखील दमदार अभिनेत्री आहे. सिनेमात अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीची नेटवर्थ 136 कोटी रुपये आहे… सिनेमासाठी अभिनेत्रीने 1.5 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.






Leave a Reply