
काँग्रेस नेते राहुल गांधी छात्रों की गूंज या विशेष कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. पुणे विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचे हे छात्रों की गूंज अभियान सुरू झाले आहे.
आज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सीओईपी परिसरातील एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात राहुल गांधींचे मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधींचा ताफा हॉटेलवर जाऊन त्यानंतर कार्यक्रमस्थळी रवाना होईल. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
Leave a Reply