
रात्र झाली की बार लोकांनी भरून जातो. मद्यविक्रीच्या दुकानांवर गर्दी होते. परंतु रात्र झाली की लोक मद्य का पितात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागचं नेमकं कारण जाणून घेऊ या…
भारतीय संस्कती आणि इथला समाज केंद्रस्थानी ठेवून विचार करायचं झाल्यास मद्यप्राशन हे वाईट मानले जाते. मद्य पिण्याची सवय असेल तर त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेला धोका पोहोचण्याचा धोका असतो. म्हणूनच भारतात लोक रात्रीच्या अंधारात मद्यप्रशान करतात.
दुसरीकडे माणूस दिवसभर धावपळ करत असतो, काबाडकष्ट करून शरीर थकलेले असते. रात्रीपर्यंत लोकांचे काम संपते, त्यामुळे मोकळा वेळ असतो. कामाचा शीनवटा घालवण्यासाठीही लोक रात्री मद्यप्राशन करतात.
मोकळा वेळ असल्याने तसेच मद्यप्राशन करताना वेळेचे बंधन पाळण्याची गरज नसते. त्यामुळेच लोक रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करतात. जगभरात रात्री मद्यपान करणाऱ्याची संख्या प्रचंड आहे. रात्री मद्यविक्री व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्याप्रशानास प्रोत्साहित करण्याचा आमचा हेतू नाही. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply