• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्री 12 च्या ठोक्याला अंगात येतं अन् दुसऱ्या दिवशी सकाळी… राज्यात आणखी एका भोंदूबाबाचा खेळ उजेडात

April 29, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे महाराष्ट्र विज्ञानवादी आणि पुरोगामी विचारांचा वारसा सांगत असताना आता दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावात एका भोंदू बाबाने दैवी शक्तीचा दावा करत अंधश्रद्धेचे दुकान थाटले आहे. त्यामुळे शेकडो भाविक या जाळ्यात अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नेमका प्रकार काय?

पोही गावातील रामभाऊ नामदेव भड नावाचा व्यक्ती स्वतःला चंदनशेष किंवा चंदनमुरारी बाबा म्हणवून घेतो. या बाबाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो दर सोमवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या अंगात सवारी येत असल्याचा बनाव रचताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दिवसाढवळ्या न घडता रात्रीच्या गूढ अंधारात पार पडतो. रात्री १ वाजल्यापासून पहाटेपर्यंत भजनाच्या गजरात हा अंधश्रद्धेचा दरबार रंगतो.

भक्तांच्या श्रद्धेशी खेळ आणि वसुली

या दरबारात बाबाकडून अघोरी कृत्ये केली जात असल्याचा आरोप आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक अघोरी उपचार केले जातात. यात भक्तांवर लिंबू पिळणे, अंगारे-धुपारे देणे आणि गंडा-दोरे बांधून आजार बरे करण्याचा दावा करणे, असे प्रकार घडतात. विशेष म्हणजे अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून हतबल महिलांची फसवणूक करणे. तुला मुलगा होईल, पण त्या बदल्यात तू मला काय देशील? अशा शब्दांत बाबा भक्तांशी संवाद साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही घटना व्हिडीओत कैद झाली आहे.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार विनामूल्य नसून, दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडून पैसे उकळले जातात. चक्क ५० रुपयांची अधिकृत पावती फाडली जाते. या बाबाच्या कृत्यामुळे गावातील सुशिक्षित तरुण आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही या बाबाविरोधात तक्रारी झाल्या होत्या. मात्र काही काळ शांत राहिल्यानंतर पुन्हा हा प्रकार सुरू झाला. अखेर, हा अंधश्रद्धेचा बाजार कायमचा बंद व्हावा यासाठी गावकऱ्यांनी अकोला पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन लेखी निवेदन दिले आहे. या भोंदू बाबावर जादू टोणा विरोधी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ?

काही दिवसांपूर्वीच मुर्तीजापुर परिसरात एका मांत्रिकाने चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळल्याची घटना ताजी असतानाच, आता हा दुसरा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे व्हायरल व्हिडिओ नेमके कधीचे आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pratap Sarnaik | आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास…प्रताप सरनाईक यांचा इशारा; सरकारचे पुढचे पाऊल!
  • ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!
  • 8 वर्षांपर्यंत नाकारलं प्रपोजल; प्रेग्नंट होताच अभिनेत्रीने लग्नाला दिला होकार
  • Indian Railway: रेल्वेची चाकं का नसतात रंगीत? त्यांना का करत नाही Paint? 99 टक्के लोकांना नाही माहिती
  • Nagpur University : नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती, रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in