• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रशियाच्या हाताला धरून इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, अमेरिकेत मोठी खळबळ, थेट…

April 27, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या मिरच्या लागल्या आहेत. त्याचे कारणही तेवढे मोठे आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दाैऱ्यावर गेले. सुरूवातीपासूनच अमेरिकेकडून आरोप केला जात आहे की, इराणला रशिया आणि चीन मदत करत आहेत. त्यामध्येच आता इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दाैऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला मोठी धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणकडे आता फक्त तीन दिवसांचा वेळ आहे. त्यानंतर त्यांच्या तेलाच्या पाईपलाईनमध्ये मोठा स्फोट होईल. फॉक्स न्यूजला डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मुलाखत दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर तीन दिवसांमध्ये निर्णय झाला नाही तर इराण तेल निर्यात करण्याच्या परिस्थितीमध्ये राहणार नाही. त्यांची तेलाची पाईपलाईन पूर्णपणे नष्ट होईल. अमेरिकेने इराण भोवती मोठी नाकेबंदी केली.

या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातून एकही जहाज जाऊ शकत नाहीये. इराणच्या तेलाची निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर दबावामुळे त्यांच्या तेलाच्या पाईपलाईन फुटू शकतात, असा मोठा इशारा देण्यात आला. इराणकडून आता नवा प्रस्ताव तसा अमेरिकेला देण्यात आला. ज्यामुळे त्यांनी होर्मुज खाडी खुली करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. इराणी परराष्ट्र मंत्री रशियाच्या दाैऱ्यावर गेल्याने. पाकिस्तानमध्ये इराणचे शिष्टमंडळ पोहोचले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यास नकार दिला. रशियाने अगोदरच या युद्धात मध्यस्थी करण्याचा मोठा प्रस्ताव दिला आहे. शिवाय पाकिस्तानच्या मध्यस्थीवर इराणने संशय व्यक्त केला.

आता रशिया इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात मध्यस्थी करणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणची मोठी कोंडी झाली. स्थिती अधिक गंभीर आहे. अमेरिकेने त्यांच्या तेलावरील निर्बंध हटवले आहेत, काही दिवसांकरिता. मात्र, तसे असले तरीही सध्याच्या घडीला इराण अजिबातच तेल निर्यात करू शकत नाही. त्यामुळे मोठा विनाश इराणमध्ये होऊ शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut| मतदारांवर दबाव आणण्यासाठी… बंगाल निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान
  • ‘धुरंधर 2’ला टक्कर देण्यासाठी ‘मेरी ल्यारी’चा ट्रेलर रिलीज; स्पाय थ्रिलरपेक्षा किती वेगळी कथा?
  • 1600 कोटींचं बजेट, पहिल्याच दिवशी 329 कोटींची कमाई; ‘धुरंधर 2’चा खेळ खल्लास करणार ‘हा’ बायोपिक?
  • West Bengal Assembly Election 2026 : PM मोदींच्या सभेआधी बंगालमध्ये मोठा राडा, आमदाराच्या घरावर बॉम्ब फेकला, परिस्थिती तणावपूर्ण
  • रशियाच्या हाताला धरून इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, अमेरिकेत मोठी खळबळ, थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in