• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रशियन महिलेनं असं काही केलं, ब्लॉगरला आली शंका, अन् भारताचं नाव…

August 16, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेकदा आपण जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जातो, जे ठिकाण आपल्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे, अशा ठिकाणी आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.  असा अनुभव अनेकांना आतापर्यंत आलाच असेल. अनेकदा परदेशी नागरिकांची देखील फसवणूक होते, मात्र जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं या परदेशी नागरिकांच्या लक्षात येतं, तेव्हा देशाचं नाव देखील खराब होतं, परदेशामध्ये आपल्या देशाबद्दल चुकीची प्रतिमा तयार होते. असाच काहीसा प्रसंग एका विदेशी महिलेसोबत दिल्लीमध्ये घडला आहे. ही रशियन महिला दिल्ली भारत दर्शनासाठी दिल्लीमध्ये आली होती, तेव्हा एक दक्कादायक घटना घडली आहे.

ही महिला विमानतळावरून बाहेर आली, तेव्हा तिथे काही महिला बसल्या होत्या, त्या गरीब होत्या, त्या महिलांनी या रशियन महिलेकडे प्रत्येकी 50 रुपयांची मागणी केली, रशियन महिलेला देखील या महिलांची दया आली आणि तिने या महिलांना सोबत घेऊन एका दुकानात या महिलांसाठी काही खाद्यपदार्थ तसेच पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या. दुकानरदाराने या महिलेकडून 1400 रुपयांचं बिल घेतलं.

परंतु या महिलेच्या शेजारीच एक ब्लॉगर देखील होता, एवढ्याशा वस्तूंचं बिल 1400 रुपये कसं होऊ शकतं? असा संशय त्याला आता तो या महिलेला घेऊन पुन्हा त्या दुकानदाराकडे गेला, तेव्हा हे बिल प्रत्येक्षात 1400 रुपये नाही तर 1100 रुपये एवढंच झाल्याचं समोर आलं. दुकानदाराने या महिलेची फसवणूक केली होती, ब्लॉगरने दुकानदाराकडून हे पैसे घेऊन त्या महिलेला दिले. त्यानंतर या महिलेनं या ब्लॉगरचे आभार मानले तसेच “तुमच्यासारख्या लोकांमुळेच भारत इतका सुंदर वाटतो.” असंही ही महिला यावेळी म्हणाली. भूमी नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा सर्व प्रसंग पोस्ट करण्यात आला आहे.

 

ये रशियन लड़की 2/3 दिन पहले दिल्ली एयरपोर्ट आई थी, वहां पर दो-चार गरीब महिलाएं बैठी थी, रशियन लड़की से 3 महिलाएं ₹50×3 पैसे मांगने लगी।

रशियन लड़की ने इंसानियत दिखाते हुए एक किराने की दुकान पर गई और उन्हें ₹1400 रुपए का तीनों को राशन खर्चा/पानी दिलवा दिया।

तभी वहां पर एक… pic.twitter.com/GRRE9MbhjH

— BHUMI (@Bhumika_2024) August 16, 2026

या ब्लागरला शंका आल्यामुळे या महिलेची फसवणूक टळली आहे. या महिलेनं या ब्लागरचे आभार मानत भारताचं कौतुक केलं आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in