
Ravindra Jadeja 350 Test Wickets: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या केशारा नुवांताला बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्सचा पल्ला गाठला आहे. यासह कसोटीत 4 हजाराहून अधिक धावा आणि 350हून अधिक विकेट खेळणारा खेळाडू म्हणून मानाचं स्थान मिळालं आहे. यासह अष्टपैलू खेळाडूंच्या मानाच्या यादीत सहभागी झाला आहे. कसोटी क्रिकेट इतिहासात 4000 हून अधिक धावा आणि 350हून अधिक विकेट घेणारा जगातील चौथा आणि भारताचा दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. यापूर्वी इयान बॉथम, कपिल देव आणि डेनियल विटोरी यांनी ही कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्या 5248 धावा आणि 434 विकेट काढल्या आहेत. इंग्लंडचा इयान बॉथम या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्याने 5200 धावा आणि 383 विकेट घेतल्या आहेत. डेनियल विटोरी तिसऱ्या स्थानी असून त्याने 4531 धावा आणि 362 विकेट घेतल्या आहेत. आता रवींद्र जडेजाने 4108 धावा आणि 350 विकेट घेतल्या आहे. रवींद्र जडेजाच्या कामगिरीत आणखी भर पडणार यात काही शंका नाही. कारण वरचे तिन्ही खेळाडू निवृत्त झाले असून जडेजाच सध्या खेळत आहे.
Milestone Alert
#TeamIndia all-rounder Ravindra Jadeja completes 3⃣5⃣0⃣ wickets in Test cricket
Sri Lanka lose their 7th wicket
Updates
https://t.co/M9LVyCAp8y#SLvIND pic.twitter.com/mJI8XBLhEr
— BCCI (@BCCI) August 17, 2026
रवींद्र जडेजाला 350वी विकेट आश्चर्यकारकरित्या मिळाली. 67व्या षटकात जडेजाने चेंडू टाकला आणि वळला. या चेंडूवर केशारा नुवांताने जोरदार फटका मारला. सिली पॉइंटला उभा असलेल्या यशस्वी जयस्वालने स्वत:ला वाचवण्यासाठी हवेत उडी मारली. पण चेंडू त्याच्या उजव्या पायाला लागला आणि हवेत उडाला. कवरला फिल्डिंग करणारा कर्णधार शुबमन गिल धावत आला आणि झेल पकडला. यासह विकेटमुळे रवींद्र जडेजाचा 350 विकेटचा पल्ला पूर्ण झाला आहे.
भारताकडून 350 विकेट घेणारा रवींद्र जडेजा हा पाचवा गोलंदाज आहे. या यादीत अनिल कुंबले 619 विकेटसह पहिल्या स्थानावर आहे. आर अश्विन 537 विकेटसह दुसऱ्या, कपिल देव 434 विकेटसह तिसऱ्या आणि हरभजन सिंग 417 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे. तर डावखुरा फिरकीपटू 350 विकेट घेणारा जागतिक स्तरावरील तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे रंगना हेराथ आणि डेनियल विटोरी आहेत.
Milestone Alert 
Leave a Reply