• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रणवीर सिंह वादात नवं वळण; CINTAA रणवीरच्या बाजूने ठाम, पद्मिनी कोल्हापुरेंचं मोठं विधान चर्चेत

May 29, 2026 by admin Leave a Comment


Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्या आगामी ‘डॉन 3’ चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. सुरुवातीला हा वाद केवळ चित्रपटातून रणवीरच्या बाहेर पडण्यापुरता मर्यादित होता, मात्र आता तो बॉलिवूडमधील दोन मोठ्या संघटनांमधील संघर्षात परिवर्तित झाला आहे. एका बाजूला FWICE रणवीरविरोधात कठोर भूमिका घेत आहे तर दुसरीकडे CINTAA रणवीरच्या समर्थनार्थ मैदानात उतरलं आहे.

काही दिवसांपूर्वी FWICE ने रणवीर सिंहविरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ म्हणजेच असहकाराचं आदेशपत्र जारी केलं होतं. या निर्णयामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या कारवाईमागे ‘डॉन 3’चे निर्माता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांची अधिकृत तक्रार असल्याचं सांगितलं जात आहे.

फरहान अख्तर यांनी FWICE कडे तक्रार करत दावा केला होता की, रणवीर सिंहने अचानक ‘डॉन 3’मधून माघार घेतल्यामुळे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसला तब्बल 45 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. या प्रकरणी FWICE ने रणवीरकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. मात्र त्यांच्याकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर संघटनेने ‘नॉन-कोऑपरेशन’चा निर्णय घेतल्याचं FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी स्पष्ट केलं.

पद्मिनी कोल्हापुरेंकडून रणवीरचं समर्थन

दरम्यान, या संपूर्ण वादात आता CINTAA ने रणवीर सिंहच्या बाजूने उभं राहत त्याला मोठा दिलासा दिला आहे. CINTAAच्या उपाध्यक्षा आणि ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी रणवीरचं उघडपणे समर्थन केलं आहे.

IANS शी बोलताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, ‘रणवीर सिंह हा आमच्या संघटनेचा सदस्य असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्याला जेव्हा आमची गरज भासेल, तेव्हा आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. हा विषय सध्या सार्वजनिक चर्चेत असल्यामुळे यापेक्षा अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मात्र आम्ही प्रत्येक टप्प्यावर रणवीरसोबत आहोत.’

या वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये चर्चांना आणखी उधाण आलं आहे. कारण, एकीकडे FWICE रणवीरविरोधात भूमिका घेत असताना दुसरीकडे CINTAA त्याला पाठिंबा देत असल्यामुळे चित्रपटसृष्टीतील दोन प्रभावशाली संघटना समोरासमोर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आता या दोन मोठ्या संघटनांमधील संघर्ष कोणत्या दिशेने जातो आणि ‘डॉन 3’च्या भवितव्यावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळा असो वा पावसाळा; कारमध्ये ‘या’ गोष्टी विसरूनही ठेवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
  • Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा
  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in