• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

येमेन येथे भारतीय जहाजावर भीषण हल्ला,जहाज थेट समुद्रात बुडाले, सर्व १४ खलाशांना…

August 4, 2026 by admin Leave a Comment


येमेनच्या जवळ भारतीय जहाजावर मोठा भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जहाज समुद्रात बुडाले आहे. या महत्वाची गोष्ट म्हणजे जहाजातील १३ भारतीय खलाशांसह १४ जणांना सुरक्षित वाचवले आहे. येमेन कोस्ट गार्डने रेस्क्यू ऑपरेशन राबवत या सर्व खलाशांना वाचवत त्यांच रवानगी मोखा बंदरात केली आहे.

इराण आणि अमेरिकेचे युद्ध थांबण्याचे काही नाव घेत नसल्याचे दिसत आहे. येमेन येथील समुद्रात एका भारतीय जहाज MSV फैझ नूरे औलियाला एका प्रोजेक्टाईन टार्गेट करण्यात आले. टक्कर झाल्यानंतर या जहाजाचे संतुलन बिघडले आणि ते समुद्रात उलटले. त्यामुळे हे जहाजात बुडाले आहे. या संदर्भात भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. जलमार्ग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री सर्बानंदर सोनोवाल यांनी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर या संदर्भात पोस्ट करीत या घटनेची माहिती दिली आहे. या हल्ला उकसवणारा असल्याचे म्हणत या घटनेचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला आहे.

येथे पाहा पोस्ट –

MEA issues a statement – We condemn the attack on the Indian flagged commercial vessel, MSV Faize Noore Oliya that sank in the Red Sea, off the coast of Yemen on August 4, 2026. All 13 Indian nationals have been rescued. Our Embassy in Riyadh is closely monitoring the situation… pic.twitter.com/0aAgtBQHJH

— ANI (@ANI) August 4, 2026

परराष्ट्र मंत्रालयाचे निवदेन

परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे, त्यात ते म्हणतात की “४ ऑगस्ट २०२६ रोजी येमेन किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या ‘एमएसव्ही फैज नूर ओलिया’ या व्यापारी जहाजावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावरील सर्व १३ भारतीय नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. रियाधमधील आमचा दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी येमेनी अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे. येमेनी अधिकाऱ्यांच्या या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत.”

निवदेनात पुढे म्हटले आहे की, ‘या भागात व्यापारी जहाजांवर सतत होत असलेले हल्ले खूप चिंताजनक आहेत. या भागात कमर्शियल जहाजांना लक्ष्य करणे बंद व्हायला पाहीजेत. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या भागात आंतरराष्ट्रीय जलमार्गातून जहाजांची येजा आणि व्यापार कोणत्याही व्यत्यया विना लवकरात लवकर बहाल व्हायला हवा’

हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग

यापूर्वी २० जुलै रोजी, हुथी बंडखोर गटाने सौदी अरेबियाविरुद्ध ‘नौदल नाकेबंदी’ जाहीर केली, ज्यामुळे रियाधने आपल्या जहाजांना लक्ष्य करणाऱ्या धमक्यांना तीव्र प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. बाब अल-मंदेब सामुद्रधुनी तांबड्या समुद्राला एडनच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडते आणि हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग आहे.

 

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
  • हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in