• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युद्ध पेटले! इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर मोठा हल्ला, जगात खळबळ, थेट जॉर्डनच्या..

June 10, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. काल होर्मुज खाडीजवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर पडले. हे हेलिकॉप्टर इराणकडूनच पाडल्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला. अमेरिकेने थेट इराणवर मोठे हल्ले केले. इराणने अमेरिकेने दिलेला दावा फेटाळून लावला. अमेरिकेने मोठे हल्ले इराणवर केले. हल्ले तात्काळ थांबवा नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा मोठा इशारा इराणकडून देण्यात आला. त्यानंतर आता हाहाकाराला सुरूवात झाली. थेट मोठे हल्ले इराणनेही आता करण्यास सुरूवात केली. जगाला ज्याची भीती तेच घडताना आता दिसत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने नुकताच सांगितले की, बुधवारी त्यांनी दक्षिण इराणी भागांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून बहरीनमध्ये हल्ला केला.

बुधवारी दक्षिण इराणी भागांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी बहरीन, जॉर्डनमधील एका अमेरिकन तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या कारवाईनंतर इराण देखील पेटून उठला आहे. अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ले इराणने केली. अमेरिकेची आक्रमकता अशाच प्रकारे सुरू राहिल्यास आणखी कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे स्पष्ट इराणकडून करण्यात आले.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमधील सिरिक या बंदर शहरातील एक दूरसंचार टॉवर आणि पाण्याच्या दोन टाक्यांचे नुकसान झाले. अमेरिकेने काही गोष्टींना टार्गेट करूनच हल्ले केल्याचे बोलले जातंय. इराणने मोठा आरोप करत म्हटले की, अमेरिका फक्त आणि फक्त खोटे कारणने सांगून हल्ला करत आहे. त्यांना हल्ला करण्यास कारण पाहिजे. सकाळी सकाळी खोटे कारने देऊन त्यांनी हल्ला केला.

बहरीनमध्ये मिसाईल हल्ला सायरन वाजले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या लष्कराला इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर अमेरिकेच्या सैन्याने इराणवर हल्ला केला. दोन्ही देशातील तणाव कमी व्हायचा तर तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. इस्त्रायल आक्रमक भूमिका घेत होता, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प शांतता ठेवण्याबाबत बोलत होते. आता स्वत: आपल्या सैनिकाला हल्ल्याचे आदेश देताना दिसत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
  • आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट
  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in