• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युद्ध, ट्रम्प यांचे टॅरिफ, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, FY26 मध्ये 7.7% टक्के जीडीपीची वाढ

June 5, 2026 by admin Leave a Comment


जगातील तेल संकट आणि महागाई अशा घटना असतानाही जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत भारताचा जीडीपीची वाढ चांगली असल्याची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ चा चौथ्या तिमाहीत अंदाजापेक्षाही जीडीपीची आकडे चांगले आले आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताची रिअल जीडीपी ग्रोथ ७.७ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी ग्रोथ रेट ७.८ टक्के राहिला असून गेल्या तिमाहीत ही वाढ ८ टक्के होती.

नॅशनल स्टॅटेस्टिक्स मिनिस्टीच्या नुसार मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात सरकारची आशा होती की अर्थव्यवस्था ७.७ टक्के वाढली आहे. मात्र, फेब्रुवारीत अर्थव्यवस्थेची वाढीचा अंदाज ७.६ टक्के लावण्यात आला होता. भारताच्या जीडीपीचे हे आकडे सांगतात की ग्लोबल अनिश्चितता आणि अनेक आर्थिक आव्हानानंतरही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत बनलेली आहे.

देशाच्या नॉमिनल जीडीपीत ८.९ टक्के वाढ राहिली आहे. तसेच FY २०२५-२६ मध्ये रिअल आणि नॉमिनल GVA मध्ये क्रमश:७.९% आणि ९.१ % वाढ राहिली आहे. कृषी आणि मासळी उत्पादनात क्षेत्रात ३.२ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे. तसेच सेकेंड्री आणि टर्शियरी सेक्टरने देखील अर्थव्यवस्थेला सपोर्ट केलेला आहे. ज्यात अनु्क्रमे ८.८ टक्के आणि ९.३ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रिअर जीडीपी वा जीडीपी ३२३.१२ लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. तर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सुधारित जीडीपी २९९.८९ लाख कोटी रुपये होती. तर नॉमिनल जीडीपी ३४६.३६ लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. तर गेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान हा ३१८.०७ लाख कोटी होता.

या क्षेत्रांमध्ये डबल डिजिट वाढ

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये, उत्पादन, व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स, वाहतूक, दळणवळण, प्रसारण आणि साठवणूक सेवा, तसेच वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा या क्षेत्रांमध्ये स्थिर आणि चालू दोन्ही किमतींवर डबल डिजिट वाढ होण्याचा अंदाज आहे. खर्चाच्या दृष्टिकोनातून, खाजगी अंतिम उपभोग खर्च ( PFCE ) आणि एकूण स्थिर भांडवल निर्मिती (GFCF) या दोन्हीत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७.५% पेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बेस इयर बदलले

हे नवीन वर्ष आणि तिमाही जीडीपीचे अंदाज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या नवीन मालिकेवर आधारित आहेत, ज्यामध्ये आधारभूत वर्ष बदलून २०२२-२३ करण्यात आले आहे हे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. असे म्हटले जात आहे की, चौथ्या तिमाहीतील ७.८% चा हा वाढीचा दर देशाचे औद्योगिक उत्पादन, उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी आगामी काळात एक सकारात्मक चिन्ह आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in