• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या वासामुळे आकर्षित होतात साप; कितीही दूर असू द्या घरात येणारच

July 27, 2026 by admin Leave a Comment


अनेकांना सापांबद्दल भीती वाटते, तसेच सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज देखील असतात. या गैर समजातून आपण अनेकदा सापांना मारतो देखील. सामान्यपणे जिथे अडचण आहे, आद्रता आणि अंधार जास्त आहे, अशा ठिकाणी सापांचं वास्तव्य असंत, अशा जागा सापांना जास्त आवडतात. परंतु अनेकदा सापांसारखे विषारी प्राणी आपल्या घरात येऊ नये, म्हणून तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवतात, कुठेही कचरा नसतो, अडचण नसते. परंतु तरी देखील साप तुमच्या घरात प्रवेश करतात, असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?  तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरातून येणारा विशिष्ट वास, असे काही विशिष्ट वास असतात जे सापांना तुमच्या घराकडे आकर्षित करतात. सापांची वास घेण्याची क्षमता ही खूप चांगली असते, काही विशिष्ट वास हे सापांना आवडतात.

ओलावा, दमटपणा आणि कुजलेल्या कचऱ्याचा वास – जर तुमच्या घरात ओलावा असेल किंवा दमटपणा असेल तर त्या जागेवरून विशिष्ट प्रकारचा वास येत असतो, तसेच जर तुमच्या घराच्या परिसरात कुठे कचरा कुजला असेल तर अशा कुजलेल्या कचऱ्याचा वास देखील सापांना आकर्षित करतो, अशा ठिकाणांकडे साप लगेच आकर्षित होतात, त्यामुळे साप तुमच्या घरात प्रवशे करू शकतात.

पाळीव जनावराच्या मल मुत्राचा वास – जर तुम्ही तुमच्या घरात एखादं जणावर पाळलं असेल जसं की गाय, म्हैस किंवा एखादा प्राणी तर अशा प्राण्यांच्या मल मुत्राला विशिष्ट प्रकारचा वास असतो, हा वास सापांना तुमच्या घराकडे आकर्षित करू शकतो. त्यामुळे जर तुम्ही असा एखादा प्राणी पाळला असेल तर स्वच्छता ठेवणं गरजेच असतं.

घराभोवती वाढलेलं गवत किंवा विशिष्ट वनस्पती  – जर तुमच्या घरामध्ये गवत वाढलेलं असेल किंवा विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असतील तर अशा वनस्पतीचा वास देखील सापांना आपल्याकडे आकर्षित करतो, ज्या ठिकाणी गवत वाढलेलं असेल तिथे साप लपून बसतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा
  • Kia चा मोठा गेमप्लॅन: भारतीय बाजारात उतरवणार 2 नव्या धासू SUVs, अल्काझार आणि व्हिक्टोरियाला देणार टक्कर
  • Chanakya Niti : महिला जातील यशाच्या शिखरावर, आचार्य चाणक्य यांच्या 4 संदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in