• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या बड्या बँकेचा आपल्या ग्राहकांना मोठा झटका; नियम बदलले, खिशाला बसणार मोठी झळ, तुमचंही खातं आहे का चेक करा

August 20, 2026 by admin Leave a Comment


भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे, एसबीआय बँकेतून पैसे काढणं आता महाग होणार आहे. जर तुमचं देखील एसबीआयमध्ये बँक खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, एसबीआयकडून बेसिक सेव्हिग जिपॉझिट खातं (BSBD) संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट फटका हा ग्राहकांना बसणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू होणार आहेत. नव्या नियमानुसार जर तुम्ही एक महिन्यात चार पेक्षा अधिक वेळा बँकेतून कॅश काढली तर तुम्हाला त्यानंतर प्रत्येक ट्रांझेक्शनसाठी 15 रुपये जादा मोजावे लाणार आहे. तसेच अतिरिक्त जीएसटी देखील द्यावा लागणार आहे.

नव्या नियमानुसार तुम्ही जर एसबीआयच्या बँक खात्यातून एकाच महिन्यात चार पेक्षा अधिकवेळा पैसे काढले तर तुम्हाला त्यासाठी प्रत्येक ट्राझेंक्शन मागे अतिरिक्त 15 रुपये तसेच जीएसटी चार्ज देखील मोजावा लागणार आहे. तुम्ही बँकेतून पैसे काढले तरच तुम्हाला चार्ज लागेल असं नाहीये, तर तुम्ही कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जसं की एटीएमने जरी पैसे काढले तरी देखील त्यासाठी तुमच्याकडून चार्ज आकारला जाणार आहे.

काय आहे नवा नियम

नव्या नियमानुसार तुम्ही तुमच्या बेसिक सेव्हिग जिपॉझिट खात्यातून एका महिन्यात केवळ चारदाच फ्रीमध्ये पैसे काढू शकणार आहात, ज्यामध्ये थेट बँकेतून पैसे काढणे, दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे, किंवा एईपीएस अर्थात आधार इनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून पैसे काढणे यांचा समावेश आहे. आतापर्यंत एईपीएस माध्यमातून होणारे सर्व ट्रांजेक्शन फ्री होते, परंतु आता त्यावर देखील चार्ज लागणार आहे. जरी तुमचे कोणत्याही माध्यमातून एक महिन्यात चार पेक्षा अधिक ट्रांजेक्शन झाले तर तुम्हाला आता प्रत्येक ट्रांजेक्शन मागे 15 रुपये जादा तसेच जीएसटी देखील भरावा लागणार आहे. चार ट्रांजेक्शन नंतर तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून 500 रुपये जरी काढले तरी देखील तुम्हाला त्यावर अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे.

काय आहे BSBD बँक खातं?

हे एक असं बँक खातं आहे, ज्या खात्यामध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स ठेवलं नाही तरी देखील चालतं, त्यासाठी बँक तुमच्याकडून कोणताही दंड आकारत नाही, तुम्ही जर बीएसबीडी अंतर्गत खातं उघडलं तर तुम्हाला बँकेकडून एटीएम कार्ड आणि इतर सुविधा फ्रीमध्ये पुरवल्या जातात. तसेच या खात्यात मिनिमम पैसे ठेवण्याची देखील चिंता नसते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in