• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या एका गोष्टीमुळे आता 150 वर्ष जगता येणार… जगातील बड्या नेत्याचं स्वप्न होणार साकार; या देशाचे वैज्ञानिक घडवणार चमत्कार

April 25, 2026 by admin Leave a Comment


मानवाचं आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. जगातील बऱ्याच देशांमधील लोकांचे सरासरी आयुर्मान 70 वर्षांच्या आसपास आहे. फार कमी असे लोक आहेत जे 100 वर्षे जगतात, मात्र आता जगात वय वाढवणाऱ्या औषधावर काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे आयुष्य वाढवणाऱ्या नव्या औषधाबाबत खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका एआय समिटमध्ये माणूस 150 वर्षांपर्यंत जगू शकतो, असं विधान केलं होतं. आता रशियाचे विज्ञान आणि शिक्षण मंत्री डेनिस सेकिरिंस्की यांनी दावा केला आहे की, रशियन शास्त्रज्ञ जगातील पहिले जीन थेरपी औषध तयार करत आहेत, जे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवू शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माणूस 150 वर्षे जगण्यासाठी संशोधन

रशियन शास्त्रज्ञ तयार करत असलेले हे औषध RAGE नावाच्या जीनला ब्लॉक करेल, जो पेशींना वृद्ध बनवण्याचे काम करतो. सेकिरिंस्की यांनी सांगितले की, हा जीन सक्रिय झाल्यावर पेशी वृद्ध होऊ लागतात, पण तो रोखल्यास पेशींचे तारुण्य अधिक काळ टिकू शकते. रशियन शास्त्रज्ञांचे उद्दिष्ट जीन थेरपीच्या मदतीने हा रिसेप्टर ब्लॉक करणे आहे. असे झाल्यास पेशी जास्त काळ तरूण राहू शकतात. त्यामुळे मानवाचे आयुष्य वाढू शकते. आता ही बातमी थेट पुतिन यांच्या दीर्घायुष्याच्या इच्छेशी जोडली जात आहे.

पुतिन आणि शी जिनपिंग यांच्याबाबत अमरत्वाच्या अफवा

पुतिन यांनी 150 वर्षे जगण्याची इच्छा आहे. त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलताना मानवी अवयव वारंवार प्रत्यारोपित करता येऊ शकतात, असे म्हटल्याचा दावा केला जातो. तसेच जास्त काळ जगल्यास माणूस अधिक तरुण दिसू शकतो, असेही त्यांनी म्हटल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुतिन यांचे विरोधक असा दावा करतात की, ते अनेक दशकांपर्यंत सत्तेत राहू इच्छितात आणि नंतर आपल्या मुलाला इवान स्पिरिडोनोवकडे सत्ता द्यायची योजना आखत आहेत. मात्र इवान सध्या केवळ 11 वर्षांचा आहे, त्यामुळे पुतिन तो मोठा होईपर्यंत सत्तेत राहू इच्छित आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Israels attack : इस्त्रायलने युद्धविराम तोडला; भीषण हल्ल्यात अख्खं शहरच उद्ध्वस्त, युद्ध पुन्हा सुरू होणार?
  • 6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला
  • भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…
  • GK : 3 खंडांनी वेढलेला एकमेव महासागर, भारताशी आहे खास नातं
  • Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in