• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

याला म्हणायचं डोकं, वडिलांचे ते 3 शब्द ऐकून मुलाने बनवले चित्रपट, ठरले ब्लॉकबस्टर

June 25, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट प्रदर्शित होताच मोठी चर्चा निर्माण करतात, परंतु काही दिवसांनंतर ते प्रेक्षकांच्या स्मरणातून हरवून जातात. मात्र काही चित्रपट असे असतात, जे अनेक वर्षांनंतरही तितक्याच प्रेमाने पाहिले जातात. टीव्हीवर लागले की आजही प्रेक्षक त्यांच्यासमोर खिळून बसतात. ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’ हे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते.

विशेष म्हणजे या तिन्ही चित्रपटांच्या यशामागे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांची मेहनत जितकी महत्त्वाची होती, तितकाच मोठा वाटा त्यांच्या वडीलांचा आहे. त्यांनी सूरज बडजात्या यांना कुटुंब, नातेसंबंध, संस्कार आणि आपुलकी यांवर आधारित कथा मांडण्याचा सल्ला दिला होता. हाच सल्ला पुढे भारतीय चित्रपटसृष्टीतील काही सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या निर्मितीचे कारण ठरला.

‘हम आपके हैं कौन’

1994 साली प्रदर्शित झालेला ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय कौटुंबिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. लग्नसमारंभ, कुटुंबातील नातेसंबंध, प्रेम, विनोद आणि भावनिक प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.

चित्रपटातील सलमान आणि माधुरीची जोडी प्रचंड गाजली. चित्रपटातील गाणी, संवाद आणि पात्रे इतकी लोकप्रिय झाली की आजही अनेक लग्नसमारंभांमध्ये या चित्रपटातील गाण्यांची धूम पाहायला मिळते.

‘हम साथ-साथ हैं’

‘हम आपके हैं कौन’च्या यशानंतर सूरज बडजात्या नव्या कथानकाच्या शोधात होते. त्यावेळी राजकुमार बडजात्या यांनी त्यांना पुन्हा एकदा कुटुंबकेंद्रित कथा तयार करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यातून ‘हम साथ-साथ हैं’ या चित्रपटाचा जन्म झाला.

मोठा कलाकारांचा ताफा असूनही या चित्रपटाचा खरा नायक त्याची कथा होती. भावंडांमधील प्रेम, आई-वडिलांबद्दलचा आदर आणि कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते यांचे अत्यंत भावनिक चित्रण करण्यात आले होते. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि तो मोठा हिट ठरला.

‘विवाह’

यानंतर आलेला ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ ला अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. त्यामुळे सूरज बडजात्या काहीसे निराश झाले होते. अशा वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना एका जुन्या वृत्तपत्रातील बातमी दाखवली. त्या बातमीमधूनच पुढे ‘विवाह’ या चित्रपटाच्या कथेला आकार मिळाला.

शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने साधेपणातून प्रेमाची सुंदर मांडणी केली. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली. चित्रपटातील गाणी आणि पात्रे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?
  • नवी मुंबईत दूध भेसळीचा पर्दाफाश, भेसळयुक्त दूध जप्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in