• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यश स्टारर ‘टॉक्सिक’ सिनेमाच्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात; 2 जण गंभीर जखमी तर…, घडलं तरी काय?

August 23, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य सुपरस्टार यश सध्या आगामी ‘टॉक्सिक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनलाठी नुकताच हैदराबाद येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमा दरम्यान असं काही घडलं ज्यामुळे दोघे गंभीर जखमी झालेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, साउंड सेट – अप खाली पडल्यामुळे दुर्घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचं भाषण बंद केलं आणि अधिकाऱ्यांना जखमींची मदत करण्यास सांगितलं. तर जखमींवर आता जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हैदराबादमधील मल्ला रेड्डी विद्यापीठात अभिनेता यशच्या आगामी ‘टॉक्सिक’ (Toxic) या सिनेमाचा ‘प्री-रिलीज’ कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. प्रचंड गर्दीमुळे पोलिसांनी वारंवार मागे सरकण्याची विनंती करूनही, अनेक लोक स्टोजच्या दिशेने पुढे सरकले. या घटनेच्या ठिकाणचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही तरुण कार्यक्रमाच्या स्थळाजवळील विविध संरचनांवर चढताना दिसत आहेत. काही जण साउंड बॉक्स आधार असलेल्या खांबावर चढत असतानाच ते अचानक कोसळले. या घटनेनंतर तिथे एकच गोंधळ उडाला. घटना घडली तेव्हा अभिनेता स्टेजवर भाषण देत होता. साउंड सिस्टम खाली पडल्यानंतर साउंड आणि लाईट बंद झाल्या आणि लाईटचा एक भाग देखील खराब झाला.

जेव्हा अभिनेत्याला या घटनेबद्दल कळलं तेव्हा त्याने तात्काळ भाषण देणं बंद केलं आणि सर्वांना म्हणाला, ‘अरे सगळ्यांनी सांभाळून… त्या ठिकणी सर्वकाही ठिक आहे? सगळे सुरक्षित तर आहेत ना?’, तर काही वेळानंतर अभिनेत्याने अधिकाऱ्यांना नेमकं काय घडलं आहे. याबद्दल विचारलं… “कृपया याकडे लक्ष द्यावं, सर. जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आयोजकांनी कळवल्यानंतर यशने त्याचं भाषण पुन्हा सुरू केलं.”

कधी प्रदर्शित होणार सिनेमा

‘टॉक्सिक’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 26 ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री किआरा अडवाणी आणि नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा सुरुर आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in