• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

म्हशीला लिफ्टमध्ये बसवून थेट बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये घेऊन गेला शेतकरी

August 16, 2026 by admin Leave a Comment


एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते. जवळपास लोक बँकेकडून कर्ज घेतात. मात्र, त्या कर्जाचे हप्ते फेडले नाही तर बँकेकडून जप्तीची कारवाई केली जाते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. त्यात एक व्यक्ती चक्क बँकेत आपल्या म्हशीला घेऊन गेला. बँकेकडून त्याला जप्तीची नोटीस आली आणि पट्ट्या स्वत:हूनच म्हशीला घेऊन बँकेत पोहोचला. सर्वात खतरनाक म्हणजे तो आपल्या म्हशीला बँकेत थेट लिफ्टने घेऊन गेला. सोशल मीडियावर ही घटना आणि व्हिडीओ चर्चेत आला. माहितीनुसार, एका शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज थकीत होते. कर्जाचा हप्ता भरण्यात अपयश ठरला. त्याला बँकेकडून नोटिस येत होत्या. बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला म्हैस जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

म्हशीची जप्ती करण्यात येणार असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला, त्यानंतर शेतकऱ्याने जे केले, त्याचा साधा विचारली बँकेच्या व्यवस्थापकांनी केला नव्हता. शेतकरी बँकेत थेट म्हशीला घेऊन पोहोचल्याने कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. असे सांगितले जाते की, हा शेतकरी आपल्या म्हशीला घेऊन लिफ्टमध्ये बसला.

त्यानंतर लिफ्टमधून थेट बँक मॅनेजरचे कॅबिन गाठले. शेतकऱ्याने बँक मॅनेजरला घ्या तुमचे तारक (सिक्युरिटी) आता इथेच सांभाळा म्हणत म्हशीला दिले. ज्यावेळी हा शेतकरी लिफ्टमध्ये म्हशीसोबत येत होता, त्यावेळी एक व्यक्ती अगोदरच लिफ्टमध्ये होती. म्हशीला घेऊन एक व्यक्ती लिफ्टमध्ये येत असल्याचे पाहून त्या व्यक्तीलाही धक्का बसला.

Bank Manager: If you don’t pay your installment by tomorrow, I’ll seize your buffalo.

The farmer calmly replied, She isn’t giving milk anyway. You can keep her.

The next day, he actually brought the buffalo straight to the manager’s cabin. pic.twitter.com/eSglyqV9hy

— Swaksh Tripathi (@SwakshTripathi) August 16, 2026

शेतकऱ्याला जप्तीची नोटीस पाठवणे बँकेलाही महागात पडले. ज्यावेळी हा शेतकरी म्हशीला घेऊन बँकेत पोहोचला, त्यावेळी उपस्थित लोकांना नक्की काय घडत आहे, हेच कळाले नाही. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. शेतकऱ्याने जे केले ते योग्यच असल्याचे अनेकांनी म्हटले. मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, एक शेतकरीच एवढे किमत दाखवू शकतो.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in