
गोंदियामध्ये मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद आणि हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. बॅनर लावण्यावरून झालेल्या या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रा यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रुपेश कुथे यांच्यावर हल्ला केला.
हा हल्ला बॅनर लावण्यावरून झालेल्या वादानंतर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचे गंभीर परिणाम म्हणून, शिंदे सेनेने कठोर भूमिका घेतली आहे. युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रा यांच्यासह इतर दोघांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा घटनांमुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Leave a Reply