• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?

June 23, 2026 by admin Leave a Comment


राज्यात सध्या शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे वातावरण तापले असताना शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, “दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचं स्वतंत्र स्थान आहे आणि दोन्ही गटांमध्ये समेट व्हावा अशी माझी इच्छा आहे.”

शिवसेना फुटीबाबत बोलताना त्यांनी एक उदाहरण देत परिस्थितीचे विश्लेषण केले. “एखादं वादळ येऊन घर पडलं तर त्यासाठी फक्त वादळालाच दोष देता येत नाही. कधी कधी घरही कच्चं असतं. त्यामुळे कोणत्याही पक्षातील फूट किंवा संघर्षामागे फक्त एकाच बाजूचा दोष नसतो. दोन्ही बाजूंचं आत्मपरीक्षण आणि संशोधन होणं गरजेचं आहे,” असे ते म्हणाले.

कडू यांनी पुढे सांगितले की, राज्याच्या आणि शिवसैनिकांच्या हितासाठी दोन्ही गटांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा विचार करावा. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष अद्याप कायम असताना बच्चू कडू यांच्या या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऋतुजा आणि गौरवचं ब्रेकअप, एक मेल आणि MPSC चा पेपरफुटी कांड; लव्हस्टोरीमुळं सगळं उद्ध्वस्त कसं झालं?
  • साखर, डाळ, अंडी… आता चिकनचे दरही भडकणार? श्रावण संपताच…
  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in