• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भाजपला जबर हादरा, काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

August 3, 2026 by admin Leave a Comment


विविध राज्यात रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने या मतदारसंघातून आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने घनश्याम सिंह यांना मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून घनश्याम सिंह 6029 मतांनी विजयी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, मतमोजणीदरम्यान घनश्याम सिंह यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती, ही आघाजी शेवटपर्यंत कायम ठेवत त्यांनी 6,029 मतांनी विजय मिळवला आहे. दतियातून माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या जागी भाजपने आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते विजय मिळवू शकले नाहीत. घनश्याम सिंह यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

कोण आहेत घनश्याम सिंह?

घनश्याम सिंह हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील दतिया आणि परिसरात दीर्घकाळ सक्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते लोकांशी सातत्याने संपर्कात असलेले राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांना मोठा जनाधार आहे. ते अनेक वर्षांपासून काँग्रेसशी जोडलेले असून, एक प्रभावी वक्ते आणि तळागाळातील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दतिया आणि सेवढा विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे.

घनश्याम सिंह यांचा राजकीय प्रवास

घनश्याम सिंह यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. ते दतिया मतदारसंघातून दोनदा आणि सेवढा मतदारसंघातून एकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 1993 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून विजय मिळवला होता, 1998 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2003 मध्ये पुन्हा विजय मिळवत ते आमदार झाले. 2008 मध्ये भाजपचे नरोत्तम मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला. 2013 मध्ये भाजपचे प्रदीप अग्रवाल यांच्याकडून त्यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला. 2018 मध्ये सेवढा मतदारसंघातून निवडणूक लढवत भाजपचे राधेलाल बघेल यांचा पराभव करून आमदार झाले. 2023 मध्ये सेवढा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली, मात्र भाजपचे प्रदीप अग्रवाल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी दतिया पोटनिवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे.

पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर

2023 साली झालेल्या पराभवानंतर घनश्याम सिंह यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला. ते दतिया आणि सेवढा मतदारसंघात सक्रिय होते. दरम्यान, दतियाचे काँग्रेस आमदार राजेंद्र भारती यांची एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर त्यांचे आमदारपद रद्द झाले आणि पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसने या निवडणुकीत घनश्याम सिंह यांना उमेदवारी दिली होती. यात विजय मिळवत काँग्रेसने ही जागा आपल्याकडेच ठेवली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
  • पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो, युरोपच्या राजकुमारीशी लग्न करणार ? सोशल मीडियावर हंगामा
  • Sadabhau Khot : ‘पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले’, मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
  • 31 August Horoscope : नोकरी, घर, पैसा, 4 राशींचे नशीब फळफळणार, वाचा आयुष्यात काय बदल होणार!
  • मोठी बातमी! हिंदू युवा वाहिनीच्या नेत्याची हत्या, कालव्यामध्ये आढळला मृतदेह

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in