• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्या भेटीला, घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत..

June 8, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र, राज्यसभेवर जाण्याकरिता त्यांनी काही अटी  ठेवल्या होत्या. त्या अटीला ग्रीन सिग्नल भाजपाकडून देण्यात आले. अचानक छगन भुजबळ यांच्या नावाची नाही तर राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हा मोठा धक्का छगन भुजबळ यांना असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या तूफान चर्चा रंगताना दिसल्या. मात्र, त्यानंतर सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ नाराज नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर कुणाला संधी द्यायची याबाबत राष्ट्रवादीत चर्चा होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी उत्सुक होते, मात्र आता राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांची राज्यसभेच्या जागेवर वर्णी न लागल्यामुळे भुजबळ पक्षात नाराज असल्याची चर्चा असतानाच देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता छगन भुजबळ आणि समीर भुजबळ निघून गेले. समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद देण्याची अट छगन भुजबळ यांच्याकडून होती. याला भाजपाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचेही सांगितले जाते.

पण ऐनवेळी भुजबळांऐवजी राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. छगन भुजबळ नाराज असल्याचे यावरून दिसत आहे. नुकताच प्रफुल्ल पटेल हे छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले आहेत. प्रफुल्ल पटेल हे मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगल्यावर दाखल झाले आहेत.

प्रफुल्ल पटेल यांच्याकडून भुजबळांची समजूत काढली जात असल्याचे कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. विधान परिषदेमध्ये आणि गोंदिया भंडारा येथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. राजेंद्र जैन यांनी दीर्घकाळ काम केलेला आहे. मात्र, राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करत मोठा धक्का भुजबळांना देण्यात आला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘कुठे आहेत तुझे बाबा’ असं डिवचताच मुख्यमंत्री विजय यांना पहिल्यांदाच सणसणीत उत्तर
  • Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला
  • प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना
  • Vaibhav Sooryavanshi : चांगल्या खेळाडूंची किंमत मोजून आम्ही..; वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत कोच स्पष्टच बोलले
  • Vaibhav Sooryavanshi: आयर्लंड क्रिकेट संघात पसरलीये वैभवची दहशत; कॅप्टन टकरने वंडर बॉयबद्दलची भीती बोलून दाखवली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in