• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! जगात जे कोणालाच जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं, संपूर्ण जग फक्त पाहातं राहिलं, रशियासोबत मिळून मोठा खेळ

April 26, 2026 by admin Leave a Comment


28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाची ठिणगी पडली. त्यानंतर अमेरिकेनं देखील इराणवर हल्ला केला. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. शेवटी युद्धाच्या 40 व्या दिवशी युद्धविराम झाला. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूजचा मार्ग व्यापारी जहाजांसाठी बंद केला होता. हा मार्ग अजूनही बंदच आहे. पूर्वी फक्त एकट्या इराणकडून हा मार्ग बंद करण्यात आला होता. आता तर अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी लावली आहे. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा सकंट निर्माण झालं आहे. आखाती देशांकडून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे.

मात्र भारतासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असताना देखील आणि अनेक देशांवर ऊर्जा संकट निर्माण झालं असताना पण भारतानं मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यानंतर तेलासाठी या मार्गावर अवलंबून न राहाता भारताने रशियाकडून करण्यात येणाऱ्या तेलाची खरेदी दुपटीने वाढवली त्याचा मोठा फायदा भारताला झाल्याचं पहायला मिळत आहे. फक्त रशियाच नाही तर भारतानं आफ्रिका, इराण आणि व्हेनेझुएलाकडून देखील तेलाची खरेदी सुरू केली आहे.

रशियाची भारताला साथ

स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यानंतर भारतानं रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या आयातीमध्ये मोठी वाढ केली आहे. मार्च महिन्यात भारतानं एकट्या रशियाकडून तब्बल 19.8 लाख बॅरल तेल खरेदी केलं आहे, जे की फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मात्र भारत केवळ रशियावरच अवलंबून राहिलेलं नाही तर आता भारतानं इराण, व्हेनेझुएला आणि आफ्रिकेकडून देखील कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे, ज्याचा भारताला मोठा फायदा झाला आहे. सध्या स्थितीमध्ये भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक खरेदी ही रशियाकडून करत आहेत. अमेरिकेनं देखील रशियावर लावलेले प्रतिबंध युद्धाच्या पार्श्वभूमीवर 16 मे पर्यंत मागे घेतलेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LSG vs KKR: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, अंगकृष रघुवंशीला ‘OBS’ पद्धतीने दिलं आऊट
  • मुंबई- पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण, १ मेला उद्घाटन, प्रवासाचा वेळ किती कमी होणार ? वाचा
  • Narendra Modi : पंतप्रधान मोदींची 300 वर्षे जुन्या थंथनिया कालीबारी मंदिरात विशेष पूजा
  • Vastu Shastra : घरात साप निघला तर सावधान, असतात हे तीन मोठे संकेत, आयुष्यच बदलू जातं
  • अमेरिका इराण युद्धादरम्यान मोठी बातमी; या देशाच्या संरक्षण मंत्र्याला स्फोटात उडवलं, अख्खं कुटुंबच संपलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in