• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आज होणार मोठा पक्षप्रवेश, राजकारणात घडामोडींना वेग

August 20, 2026 by admin Leave a Comment


राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. राज्यात ऑपरेशन टायगर झालं. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का होता. आता शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त तीनच खासदार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा मात्र वाढला आहे.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील असंच चित्र पहायला मिळालं होतं. या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक झाल्यानंतर देखील अनेकांनी महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. काही ठिकाणी तर थेट महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांनीच महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहाय मिळालं, दरम्यान आता राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

कळंब नगर परिषदेतील उद्धव ठाकरे गटाचे ९ आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक असे दहा नगरसेवक आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आज सोलापूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जे  9 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामध्ये आठ नगरसेवक हे निवडून आलेले आहेत, तर एका स्वीकृत नगरसेवकाचा समावेश आहे. एकूण १० नगरसेवकांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे कळंब नगर परिषदेतील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे पारडे आता जड होणार आहे.

कळंब नगर परिषदेत कोणाचे किती नगरसेवक?

कळंब नगर परिषदेमध्ये सध्या स्थितीत शिवसेना शिंदे गटाचे चार, भाजपचे सहा, शिवसेना ठाकरे गटाचे 9 तर काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. परंतु आज यातील महाविकास आघाडीचे दहा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in