
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर हे यश त्यांना टिकवून ठेवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीच्या निकालापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंद गट आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यचां पहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे विभाग समन्वयक बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे, त्यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला ठाण्यात मोठं खिंडार पडलं आहे. तसेच आता महाविकास आघाडीमध्येच फोडा-फोडीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
Leave a Reply