• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्यानं सोडला पक्ष, शिंदेंच्या शिलेदारानं गेम फिरवला

August 23, 2026 by admin Leave a Comment


लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यता महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पारभव झाल्याचं पहायला मिळालं. परंतु त्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हे यश महाविकास आघाडीला टिकवटा आलं नाही, आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या महायुतीचं जोरदार कमबॅग झालं. राज्यात पुन्हा एकाद महायुतीचं सरकार आलं. या पराभवाच्या धक्क्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळालं, अनेक दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश केला, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटला आणखी एक मोठा झटका बसला आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तसेच माजी युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते डॉ. चेतन बोराडेंसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे धाराशिव जिल्हा हा ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असताना, ठाकरे गटातील पदाधिकारी एकापाठोपाठ पक्षांतर करत आहेत, यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगर पार पडलं, हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी वेगळा गट निर्माण करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा वाढला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त तीनच खासदार उरले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आता  ठाकरे यांना धाराशिवमध्ये हा मोठा धक्का बसला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in