• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द

August 21, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने हा निर्णय घेतला आहे. आता विशाखा राऊत कोर्टात अपील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखा राऊत या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने घेतला आहे. हा उद्धव ठाककेंना मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, या निर्णयाचा विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नाही. त्यामुळे राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. हा विषय सभागृहात मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बुशरा नदीम मलिक यांचेही नगरसेवक पद रद्द

याआधी राष्ट्रवादीलाही मोठी धक्का बसला होता. मुंबई महापालिकेत प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी आहे. बुशरा यांचेही नगरसेवक पद जात पडताळणी समितीने रद्द केले होते. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने ठाकरे गटालाही मोठा धक्का बसला आहे.

रोशन शेख यांचेही पद रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या AIMIMच्या नगरसेविका रोशन शेख यांची सदस्यता रद्द केली होती. जात पडताळणी समितीने त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. महापालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 27 एप्रिल 2026 रोजी रोशन शेख यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरवले. हे प्रमाणपत्र नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in