• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी घडामोड! सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार; पण सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

July 20, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी केंद्र सरकारसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलन आणि सरकार यांच्यातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोनम वांगचुक यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा या मुद्द्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून जंतरमंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत मेडिकल बुलेटिननुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी त्यांच्या उपचारांबाबत काही गंभीर आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची परवानगी देण्याची मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

याचदरम्यान सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबाबत केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी. तसेच, स्वतःला आणि अभिजित दीपके यांना संसदेत जाऊन या मुद्द्यावर आवाज उठवण्याची संधी द्यावी. जर प्रकृतीमुळे संसदेत जाता आले नाही, तर वरिष्ठ नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन लेखी आश्वासन द्यावे.

दरम्यान, वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरही आंदोलन थांबलेले नाही. जंतरमंतर येथे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच असून, आंदोलनस्थळी हालचाली वाढल्याचे सांगितले जात आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली असून, यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आता केंद्र सरकार सोनम वांगचुक यांनी ठेवलेल्या अटी स्वीकारते का आणि या आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लीबोल
  • ‘अभिनेत्याशी लग्न म्हणजे…’ अर्शद वारसीशी लग्नाआधी जया बच्चन यांनी मारियाला दिला होता इशारा
  • Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक
  • Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
  • Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in