• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी खळबळ, चीनने भारतीय सीमेवर तैनात केली 11 स्टेल्थ फायटर जेट, भारताकडे उत्तर काय ?

July 30, 2026 by admin Leave a Comment


चीनने भारताच्या सीमेजवळ आपले ११ स्टेल्थ फायटर जेट्सना तैनात केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. याचे सॅटेलाईट फोटो देखील वेंटरने जारी केले होते. या संदर्भात वृत्त एका खाजगी चॅनलने दिले होते. चीनने जूनच्या अखेर आणि जुलैच्या सुरुवातीला त्यांच्या दोन एअरबेसवर J-20 ‘मायटी ड्रॅगन’ फाइटर जेट्सची तैनाती वाढविली आहे. हे फायटर जेट्स स्टेल्थ टेक्नॉलॉजी संपन्न आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

ड्रॅगनने कुठे केली तैनात केली खतरनाक फायटर्स ?

शिनजियांग उइघुर ऑटोनॉमस रिजन येथील होटन एअरबेसवर J-20 लडाऊ विमाने पाहायला मिळाली आहेत. यात चिंताजनक गोष्ट ही की हा बेस लेहपासून 389 किलोमीटर उत्तर-पूर्वमध्ये आणि उत्तर लडाखमध्ये इंडियन एअरफेसच्या दौलत बेग ओल्डी एअरफिल्डपासून केवळ 245 किलोमीटर उत्तर-पूर्वमध्ये स्थित आहे.

या संदर्भात आलेल्या सॅटेलाईट इमेजने स्पष्ट झाले आहे की कोणत्याही चीनी एअरबेसपर पाहिलेल्या J-20 विमानांची ही सर्वाधिक संख्या म्हटली जात आहे. तर दुसऱ्या एका सॅटेलाईट फोटोत तिबेटच्यास ल्हासा भागातील डॅम्सुंग एअरबेसच्या फ्लाइटलाईनवर चार J-20 विमान तैनात केलेली आहेत. हा एअर बेस अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून 344 किलोमीटर उत्तर-पश्चिम दिशेला आहे.

India AMCA project : भारताला एक दशकाचा उशीर

नव्या जमान्याच्या युद्धासाठी नवीन टेक्नॉलॉजी गरजेची असते. चीन स्टेल्थ फायटर जेटच्या सहाव्या पिढीवर काम करत आहेत. भारताकडे सध्या तरी कोणतेही स्टेल्थ फायटर जेट विमान उपलब्ध नाही. स्टेल्थ फायटर शत्रूच्या रडाराला चकवा देऊन हल्ला करते. याला कोणत्याही रडार-नेव्हीगेशनने ट्रॅक करणे शक्य नसते. याचा अर्थ शत्रू आरामात येणार आणि हल्ला करुन जाणार आणि तुम्हाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही.

भारताचा पहिला स्टेल्थ फायटर जेट प्रोजेक्ट कुठपर्यंत ?

भारताचा पहिला स्वदेशी पांचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट AMCA म्हणजे एडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोजेक्टच्या अंतर्गत विकसित केला जात आहे. या प्रोजेक्टचा वेगाने विकास करण्याची जबाबदारी एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) सह अन्य प्रायव्हेट कंपन्यांना दिली आहे.

देशी स्टेल्थ फायटर जेटची वैशिष्ट्ये ?

AMCA प्रोजेक्टचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शत्रूंच्या रडारपासून विमानाला वाचवणे आहे. या जेटमध्ये दोन इंजिने आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे याची मिसाईल्स बाहेरुन दिसत नाही. तर याच्या इंटर्नल वेपन बेमध्ये ती लपवलेली असतात. जोपर्यंत शत्रूला समजेल तोपर्यंत या विमानांनी मोहिम फत्ते केलेली असते. हे विमान 1.5 टन शस्रास्रे स्वत:सोबत वाहून नेऊ शकते. याशिवाय ए़डव्हान्स रडार, सेंसर फ्युजन, AI असिस्ट सिस्टम, सुपर क्रूझ कॅपेबिलिटी उपलब्ध असते.

देशाला केव्हा मिळणार स्टेल्थ फायटर जेट?

या देशी स्टेल्थ फायटर जेटचे पहिली आवृत्ती साल 2027च्या अखेर येण्याची शक्यता आहे. पहिले उड्डाण साल 2028 च्या शेवटी होण्याची शक्यता आहे. साल 2034 पर्यंत यास भारतीय वायूसेनेत औपचारिकरित्या दाखल करणे आणि सर्टीफाईड करण्याचे ध्यैय्य आहे. म्हणजे स्टेल्थ फायटर जेटला दाखल होईपर्यंत अजून एक दशक लागू शकते असे AMCA प्रोजेक्टचे मुख्य प्रोजेक्ट डायरेक्टर कृष्णा राजेंद्रा नीली यांनी सांगितले.  भारत सध्या या विमानाचा विकास करत आहे. इंजिन (GE 414)आणि काही उपकरणे परदेशातून येणार आहे. परंतू गेल्या दहा वर्षांत भारत आयातीलवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

जेट इंजिन सर्वात महत्वाचे

या स्टेल्थ फायटर जेटच्या प्रोटोटाईपसाठी अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रीकच्या F414 इंजिनवर अवलंबून राहावे लागेल. योजननुसार पुढे जाऊन आपण परदेशी भागीदाराशी मिळून भारतातच शक्तीशाली इंजिन तयार करणार आहोत. जोपर्यंत हे इंजिन तयार होत नाही तोपर्यंत स्टेल्थ जेट फायटर तयार करणे हे एकप्रकारचे स्वप्नच राहणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in