• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुस्लिमाला असा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? महाराष्ट्रातील अभिनेत्रीला केरळात असा सवाल, सोशल मीडियावर राडा

August 17, 2026 by admin Leave a Comment


आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त महाराष्ट्रातील एक अभिनेत्री नुकतीच केरळला गेली होती. तिथल्या पत्रकारांशी संवाद साधताना अचानक तिला असा प्रश्न विचारण्यात आला, ज्यामुळे क्षणभरासाठी ती सुद्धा थबकली होती. ‘खलिफा: द इन्ट्रो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मालविका शर्मा केरळला गेलो होती. चित्रपटाबद्दल विविध प्रश्नोत्तरं सुरू असताना अचानक मालविकाला वेगळाच सवाल करण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर काय आणि कसं द्यावं, या पेचात ती पडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

पत्रकार परिषदेत मालविकाला एकाने विचारलं, “तुला बीफ (गोमांस) आवडतं का?” चित्रपटाविषयी बोलताना अचानक असा काही प्रश्न विचारला जाईल, याची कल्पनाही तिने केली नव्हती. तरी मालविकाने पुढे स्पष्ट उत्तर दिलं की, “मी शाकाहारी आहे आणि मी आजवर बीफ खाल्लं नाही.” तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बीफ खाण्याचा मुद्दा कुठून आला, असा सवाल एकाने केला. तर मालविकाला विचारलेला प्रश्न अनुचित होता, असं मत दुसऱ्या युजरने व्यक्त केलं. ‘असा मूर्ख प्रश्न विचारण्याची खरंच गरज आहे का’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर ‘मालविका शर्मा ही हिंदू ब्राह्मण आहे. तिला बीफ खाल्लं का, असा प्रश्न का विचारला. तोच पत्रकार एखाद्या मुस्लिमाला डुकराचं मांस खाल्लं का, असं विचारेल का’, असा संतप्त सवाल एका युजरने केला.

Kerala has become a worst state with most of Anti-Hindu People.

>She is Malavika Sharma, A North Indian actress with Brahmin surname.
>She visited Kerala for a film promotion
>A Reporter came and started asking some inappropriate questions

And then he asked “Did you like… pic.twitter.com/3E7YxTux9F

— Courageous (@CourageousRo) August 17, 2026

काही दिवसांपूर्वी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर केरळमधल्याच एका कार्यक्रमात भगव्या रंगाचा ड्रेस परिधान करून गेली होती. त्यावेळी तिलाही तिच्या ड्रेसवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर आता मालविकाला असा प्रश्न विचारल्याने शंभर टक्के साक्षरता असलेल्या राज्यात चाललंय तरी काय, असं म्हटलं जात आहे.

मालविका ही मूळची महाराष्ट्रातील असून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. ‘रेड’, ‘नेला तिकीट’, ‘हरोम हरा’ आणि ‘भीमा’ यांसारख्या तेलुगू चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in